
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा जिल्हा दौरा
छत्रपती संभाजीनगर, (जिमाका):- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे मंगळवार दि.२४ व बुधवार दि.२५ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
मंगळवार दि.२४ रोजी सायं. सव्वा सहा वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व एमजीएम कॅम्पस कडे प्रयाण, सायं.साडेसहा वा. रुक्मिणी हॉल, सिडको एन ६, एमजीएम कॅम्पस येथे आगमन व बैठकीसाठी राखीव, ऱात्री ८ वा. ३५ मि. नी.मोटारीने हॉटेल रामा इंटरनॅशनल कडे प्रयाण, रात्री.८ वा. ४० मि. नी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आगमन, रात्री सव्वा नऊ वा. बैठकीसाठी राखीव. नंतर मुक्काम.
बुधवार दि.२५ रोजी सकाळी ११ वा. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथून मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ११ वा. १० मि. नी. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व सकाळी ११ वा. १५ मि. नी विमानाने नाशिककडे प्रयाण.
०००००



