vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारीकरीता प्रशिक्षण संपन्न…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारीकरीता प्रशिक्षण संपन्न…

 

        , राज्य प्रतिनिधी : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 प्रक्रियेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अधिकारी यांच्या सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.

 

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने यावेळी प्रशिक्षणात पात्रता-अपात्रता, नामाकंन, गुन्हेगारी पूर्ववृत्तांबद्दल सूचना, नामांकन सुरक्षा, मतदान केंद्र तपासणी, अतीसंवेदनसिल मतदान केंद्र निश्चित करणे, मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्राचे नियोजन, एमसीएमसी, पेड न्यूज, आदर्श आचारसंहितेचा भंग, स्वीप, ईव्हीएम-व्हीव्हीपॅट, पोस्टल मतदान, सी-व्हीजील प्रणाली आदी विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली.

 

प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, विधानसभा निवडणूकीसाठी खुप कमी कालावधी राहिला आहे. याकरीता निवडणूक प्रक्रियेतील सर्व यंत्रणांनी निवडणुकीच्या कामाचे सुक्ष्म नियोजन करुन जबाबदारीने कामे पार पाडावीत. तसेच सोपविण्यात आलेल्या जबाबदारीची पूर्वतयारी करावी.

 

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार,जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, जिल्हा सूचना अधिकारी आर. पी. पडळकर,उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, उपविभागीय अधिकारी दिपक पाटील, डॉ. दयानंद जगताप, पद्यमाकर गायकवाड यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षणास सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 

****

संबंधित पोस्ट

दिपावली सणाच्या काळात डेअरींची अन्न व औषध प्रशासनाकडून होणार तपासणी…

vishwatmaklokswamivarta

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन !

vishwatmaklokswamivarta

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम- महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार..

vishwatmaklokswamivarta

विशेष लेखः-‘आला पावसाळा; आरोग्य सांभाळा’

राज्याचे चे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एन डी ए ला पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडी कमकुवत होईल; रामदास आठवले यांचा दावा…

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांचा महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले, वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी..