vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवीन सिटीस्कॅन मशीनमुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

नवीन सिटीस्कॅन मशीनमुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

 

 राज्य प्रतिनिधी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्राप्त झालेल्या नवीन सिटीस्कॅन मशीनमुळे सर्व दारिद्र्य रेषेखालील रुग्ण तसेच विविध योजनांमधील रुग्णांची मोफत व इतर रुग्णांची फक्त 350 रुपये मध्ये सिटीस्कॅन चाचणी होणार आहे. त्यामुळे रुग्णांना कमी दरात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळेल, असा विश्वास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केला.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्राप्त झालेल्या नवीन सिटीस्कॅन मशीन व विभागाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. खाडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

हे सिटीस्कॅन मशीन अत्यंत अत्याधुनिक 128 स्लाईस क्षमतेचे असून दिवसाला 80 ते 100 सिटीस्कॅन करू शकते. सिटीस्कॅन दोन ते पाच मिनिटांमध्ये होऊ शकतो. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सगळ्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

 

खासदार विशाल पाटील यांनी मनोगतात सिटी स्कॅन मशीनमुळे रुग्णांचा फायदा होणार असल्याचे सांगून चांगल्या आरोग्य सेवेबद्दल प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

 

पाचशे खाटांचे रुग्णालय लवकरात लवकर बांधून व्हावे यासाठी पाठपुरावा करत आहे व नवीन बाह्यरुग्ण विभाग इमारत बांधण्यासाठी प्रयत्न केल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले.

 

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सिटीस्कॅन मशीन लवकरात लवकर रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. या कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, उपाधिष्ठाता डॉ. अहंकारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे, डॉ. विकास देवकारे, डॉ. मनोहर कचरे, प्रशासकीय अधिकारी श्री. भोरे व इतर सर्व विभागाचे विभाग प्रमुख परिचारिका वर्ग तसेच रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

०००००च्‍

संबंधित पोस्ट

महिलांसाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारावे- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यावर ..

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच-संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये आज आक्रोश मोर्चा…

vishwatmaklokswamivarta

अग्निपथवर होणार मोठा निर्णय? लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांची पत्रकार परिषद

राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 1817 वादपूर्व प्रकरणे निकालीएकूण वीस कोटी अडोतीस लाख दहा हजार पाचशे तेहतीस रुपयांची वसुली..

vishwatmaklokswamivarta

१०० कोटी खंडणी वसुली प्रकरण: सचिन वाझेचा देशमुख च्या विरोधात ‘ईडी’ने जबाब नोंदवला…

मासेमारी करणाऱ्यांनाही मिळणार किसान क्रेडीट कार्ड;मच्छिमार संस्थांना नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta