vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

पहिल्याच दिवशी सोने चांदीची मोठी घसरण- शेअर बाजार मात्र तेजीत भाव वधारले

पहिल्याच दिवशी सोने चांदीची मोठी घसरण- शेअर बाजार मात्र तेजीत भाव वधारले

 

व्यावसायिक प्रतिनिधी

काल झालेल्या व्यावसायिक शेअर बाजारात मोठी घसरण पाहण्यास मिळाली सोने चांदी दरात घसरण झाली तर शेअर बाजार मात्र तेजीत असल्याचे चित्र दिसत आहे-बाजारात : दिवाळीला  विक्रम संवत २०८१ च्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजीचे फटाके फुटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३३५.०६ अंकांनी अथवा ०.४२ टक्क्याने वाढून ७९,७२४.१३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९९ अंकांनी अथवा ०.४१ टक्क्याने वाढून २४,३०४.३५ अंकांवर बंद झाला.

सायंकाळी ६ ते ७ या वेळात शेअर बाजारात मुहूर्ताचे ट्रेडिंग झाले. बाजारातील मुहूर्त ट्रेडिंग हे १ तासाचे प्रतीकात्मक ट्रेडिंग असते. दरवर्षी दिवाळीच्या दिवशी सायंकाळी ते होते. शुक्रवारच्या मुहूर्त सौद्यांत निफ्टीमधील ५० पैकी ४२ कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले. ८ कंपन्यांचे समभाग घसरले.

सोने ३००, चांदी १५०० रुपयांनी घसरली : सोने-चांदीच्या भावात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घसरण झाली. सोने ३०० रुपयांनी घसरून ७९ हजार ७०० रुपयांवर आले तर चांदीत थेट एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ९७ हजार ५०० रुपयांवर आली असेही वृत्त एका वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर ही देण्यात आलेले आहे

संबंधित पोस्ट

पनवेल येथे दुचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकासाठी नवीन मालिका सुरु

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण, पहिल्यांदाच 78 रुपयांच्या खाली गेला

आले लग्नाचे दिवस, करा स्वस्तातले सोने खरेदीची घाई, जाणून घ्या राज्यातले दर…!

vishwatmaklokswamivarta

जालना येथे मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय डाक ग्रामीण सेवक पदासाठी 3 मार्च पर्यंतऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta