
6 डिसेंबर परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनीसुट्टी जाहीर शाळा कॉलेज, बॅंका,दारूची दुकानं बंद..
राज्य प्रतिनिधी –
6 डिसेंबर हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. या दिवशी बाबासाहेबांचे भक्त बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन अर्पण करतात. संपूर्ण देशभरातून मुंबईतील दादर चैत्यभूमी येथे बाबासाहेबांच्या स्मृती अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने बांधव येथे येत असतात यामुळे आज महाराष्ट्रात राज्य सरकार कडून 6 डिसेंबरला स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. दही हंडी, गणेश विसर्जन नंतर ही राज्य सरकारकडून यंदाच्या वर्षात जाहीर करण्यात आलेली तिसरी सुट्टी आहे. त्यामुळे आता अचानक सुट्टी जाहीर झाल्याने नेमकं उद्या 6 डिसेंबरला राज्यात दारूच्या दुकानाला बंदी घालण्यात आलेली आहे. आज 6 डिसेंबर राज्य सरकारने सर्वत्र सुट्टी जाहीर केली.
सरकारी कार्यालय- सरकारने सुट्टी जाहीर केल्याने सारी सरकारी कार्यालयं बंद राहणार आहेत.दारूची दुकानं – मुंबई जिल्हाधिकार्यांकडून 6 डिसेंबर हा ड्राय डे जाहीर झाल्याने दारू विक्री बंद राहणार आहे. शेअर मार्केट – राज्य सरकारने स्थानिक सुट्टी जाहीर केली असली तरीही शेअर बाजार सुरूच राहणार आहे. Is Stock Market Open Tomorrow? भारतीय शेअर बाजार उद्या सुरु राहणार की महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुट्टी? घ्या जाणून बॅंका – राज्य सरकारने स्थानिक सुट्टी जाहीर केली असली तरीही स्टेट बॅंक ऑफ इंडिया सह प्रायव्हेट बॅंकाही सुरू राहतील.
शाळा, कॉलेज – मुंबईतील सर्व शाळांना शिक्षण विभागाच्या क्लस्टर रिसोर्स सेंटर (CRC) कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार उद्या शाळा बंद ठेवल्या जातील. शिक्षण उपसंचालकांनी मुंबईतील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी सुट्टी असेल.
दरम्यान मुंबई मध्ये चैत्यभूमीवर भीम अनुयायी मोठ्या संख्येने जमून बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन करतात त्यामुळे दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. तसेच मध्य रेल्वे कडूनही अधिकच्या मुंबई लोकल्सची तयारी ठेवण्यात आली आहे



