हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज नागपूर मध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळविस्तार…
राज्य प्रतिनिधी -महायुती सरकार मध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण मंत्रीपदाची शपथ घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि सहकारीही इच्छुक मंत्र्यांच्या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे
थेट नागपूर येथील विधानसभा परिसरातून अनेक टीव्ही चॅनेल्सवर लाईव्ह असणार हा शपथविधी सोहळा मंत्रिमंडळाचा विस्तार 288 विधानसभा जागांचा निवडणूक निकाल जाहीर झाला त्यामध्ये भाजपाला 132, शिवसेनेला 57 आणि एनसीपीला 41 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता मंत्रिपदाची माळ देखील पक्षाला मिळालेल्या जागांवरूनच तिन्ही पक्षांत विभागली जाणार आहे. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या जागांवरून तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तिन्ही पक्षांचा युतीमध्ये योग्य तो सन्मान राखत मंत्रीपदं दिली जातील असं म्हटलं होतं. तसेच मंत्र्यांचं मूल्यांकन करूनच ही मंत्रिपदं दिली जातील असेही ते म्हणाले होते. कुणाला मंत्रिपद मिळणार हे प्रत्यक्ष पाहावयास मिळेल
नागपूर मध्ये 33 वर्षांनी आज यापूर्वी 1991 साली शिवसेनेमधून छगन भुजबळ कॉंग्रेस मध्ये आले होते तेव्हा त्यांना थेट मंत्रिपद देण्यात आले होते. त्यांचा शपथविधी नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशनात झाला होता त्यामुळे तो नागपूर मध्ये संपन्न झाला होता. यंदाही मंत्रीपदाचा शपथविधी नागपूर मध्ये होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर हा दुसरा मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा आहे. राजभवनाच्या लॉन वर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार