vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

संघर्षनायक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून देशभर साजरा करणार*

*संघर्षनायक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून देशभर साजरा करणार*

 

मुंबई प्रतिनिधी – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे देशभरातील बहुजनांचे संघर्षनायक, लोकनेते म्हणून लोकप्रिय आहेत. संघर्षनायक ना.रामदास आठवले यांचा 25 डिसेंबर हा वाढदिवस रिपब्लिकन पक्षाच्यावतीने दरवर्षी देशभर संघर्षदिन म्हणून साजरा केला जातो. येत्या 25 डिसेंबर 2024 रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून देशभर साजरा करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाच्यावतीने देशभरात सर्व राज्यात आणि जिल्हयांमध्ये ना.रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमीत्त गरिब गरजूंना मोफत अन्न, वस्त्र, शाल; चादर ब्लँकेट; कपडे यांचे वाटप केले जाणार आहे .तसेच देशभर रक्तदान ; आरोग्य तपासणी; मोफत औषधोपचार असे अनेक सामाजिक उपक्रम राबवुन संघर्ष दिन साजरा करण्यात येणार आहे.

  संघर्षनायक केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून साजरा करतांना मुंबईसह सूंपर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात विविध जिल्हयांमध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीने अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत फळे वाटप करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत.

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर, विविध रुग्णालयांमध्ये फळ वाटप करण्यात येणार आहेत. तसेच अनेक बुध्द विहारांमध्ये लाडुंचे वाटप करण्यात

येणार आहे. तसेच अनेक गरिबांना थंडीपासून वाचण्यासाठी चादर, ब्लँकेटचे वाटप करण्यात येणार आहे. आणि गोरगरिब विद्यार्थ्यांना एक वही एक पेन सुध्दा वाटप करुन संघर्षनायक ना. रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

 केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या राजकीय वाटचालीमध्ये अत्यंत कठीण संघर्ष केला आहे. आणि संघर्षाचे दुसरे नांव म्हणजे रामदास आठवले आहे. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना संघर्षनायक नेते म्हणून गौरविले जाते. त्यामुळे संघर्षनायक ना. रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देशभर साजरा केला जातो. संघर्ष दिनानिमीत्त रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीने विविध ठिकाणी समाजपयोगी उपक्रम राबवुन संघर्ष दिन म्हणून ना. रामदास आठवले यांचा वाढदिवस साजरा केला जातो.अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

विधानसभा प्रश्नोत्तर :शासकीय रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि एमआरआय-मशीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार वैद्यकीय शिक्षण विभागाकडील खरेदी शासन नियमानुसारच – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज ठाणे दौऱ्यानिमित्त वालावलकर सभा मैदान,तात्पुरते रेड झोन घोषित…

पावसामुळे,सायन-पनवेल मार्गावर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ‘ट्रॅफिक जाम.

अनुसूचित जाती व नवबौध्द व्यक्तींनी रमाई आवास योजनेचा लाभ घ्यावा – सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे

vishwatmaklokswamivarta

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांचा इमारतीवरून उडी मारून आत्महत्या..

vishwatmaklokswamivarta

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबवा – रोहयो मंत्री भरत गोगावले