vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विधानसभा प्रश्नोत्तर :शासकीय रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि एमआरआय-मशीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार वैद्यकीय शिक्षण विभागाकडील खरेदी शासन नियमानुसारच – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

विधानसभा प्रश्नोत्तर :शासकीय रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि एमआरआय-मशीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

वैद्यकीय शिक्षण विभागाकडील खरेदी शासन नियमानुसारच – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, प्रतिनिधी: राज्यातील सर्वसामान्य गरीब रुग्णास आरोग्याच्या अत्यावश्यक व दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल. नियोजन समितीच्या निधीतून राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन, एमआरआय मशीन खरेदी करण्यासाठी राज्यस्तरावरून नियमावली करून देण्यात येईल. या नुसार सिटीस्कॅन, एमआरआय मशीन खरेदी करण्यासाठी ज्या जिल्ह्यांचा प्रस्ताव प्राप्त होईल त्यास मान्यता दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

 

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, सिटीस्कॅन, एमआरआय मशीन खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीचा काही निधी राखीव ठेवण्यात येईल. राज्यात सिटीस्कॅन आणि एमआरआय मशीन अभावी रुग्णांवरील उपचारास बाधा निर्माण होणार नाही याची दक्षताही घेतली जाईल.सदस्य संजय पोतनीस यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री अमित देशमुख, निलेश राणे, नाना पटोले, साजिदखान पठाण आणि अजय चौधरी यांनी उपप्रश्न विचारून सहभाग घेतला.

राज्यातील आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विषयक सुविधा अधिक बळकट करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडील खरेदी शासन नियमानुसारच करण्यात येत असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयांनी पाठवलेल्या यंत्र सामग्री व अन्य आरोग्य विषयक सुविधांच्या खरेदीच्या प्रस्तावाची वरिष्ठ स्तरावर तपासणी करण्यात येऊन त्यानंतर ई निविदा प्रक्रिया राबवून खरेदी करण्यात येते.

 

मंत्री श्री. म्हणाले, वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर भर देण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक प्राध्यापक, कर्मचारी व तांत्रिक पदांची भरती केली जाणार आहे. सिंधुदुर्ग, भंडारा या जिल्ह्याना भेट देऊन तेथील रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधेचा आढावा घेतला जाईल, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

0000000

संबंधित पोस्ट

जंगलात भटकू नका, मुख्य प्रवाहात या” — आत्मसमर्पित संगीता उर्फ ललिता यांचे नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 4 ने 3 अवैध बंदुक आणि जिवंत दारूगोळा बाळगलेल्या दोन अटक

vishwatmaklokswamivarta

दिल्लीत गणरायाचे भक्तिमय स्वागत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा; महाराष्ट्र सदनासह मंडळांमध्ये उत्साहाचा जयघोष

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरतीसाठी सुधारित जाहिरात..

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीतून 100 कोटींच्या निर्यातीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा**महानिर्यात-इग्नाईट कन्व्हेन्शन 2026 एक दिवसीय परिषद संपन्न*

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 काय करावे व काय करु नये मार्गदर्शक सूचना जारी…

vishwatmaklokswamivarta