वारसा परमेश्वर स्वता: निर्गुण, निराकार,शांत,वासनारहित असून त्याला स्वतःला अहं ब्रह्यं: अशी इच्छा निर्माण झाली.अशी इच्छा निर्माण झाल्यानंतर, इच्छेच्या सहाय्याने जगाची रचना केली. या इच्छेलाच वेदांतात माया,कर्म,चितशक्ती असे नावे आहेत परमेश्वर ,स्वतः निर्गुण असताना, गुणांची उपाधी पाठीमागे लावून घेऊन, मायेला जोडीदार बरोबर करुन जगाचा संसार करु लागला. अशा रितीने परमेश्वर स्वातःच प्रथम या संसार चक्रात गुंतून गेला. याला सुद्धा जगाची उत्पत्ती,स्थिती, लय या भानगडीत पडावे लागले. ही भानगड सतत चालू रहावी म्हणून या दोघांनी एक मोठी बहारीची
शक्कल लढवली, ती ही की, जीवाला कायमच्या संसार चक्रात गोवून टाकले. हे संसारचक्र म्हंणजे ( पुर्वजन्म,चालुजन्म, पुनर्जन्म) जन्ममरणाची परंपरा कायम चालविण्याकरता जिवाच्या मागे कर्माची भगभग लावुन टाकली. उदाहरणार्थ:::नाटकाची कल्पना घ्या स्टेज म्हंणजे एक चिमुकले जग. या चिमुकल्या जगात प्रथमत: सुत्रधार व नटी येऊन येऊन आपण कोणते नाटक करणार जे जाहीर करतात. नंतर नटी ही सर्व पात्रांची सिद्धता करण्यासाठी सुत्रधाराची आज्ञा घेऊन जाते. आज पात्रांची तयारी असते. पण नटी ही कर्माची (कामाची) विभागणी करते. आणि प्रत्येक पात्राला त्याचे काम मागे लावते. ती कोणाला राजा बनविते तर कोणाला शिपाई,
कोणाला राणी तर कोणाला दासी, कोणाला मारेकरी तर कोणाला साधु, अशी कामे देऊन ते बाजुला राहतात. पुढे नाटक संपेतोपर्यंत प्रत्येक नट व नटी आपआपल्या योग्य ते प्रमाणे बुद्धी बलानुसार स्टेज वर कामे करुन जातात.एकदा नाटक सुरु झाल्यावर पात्रांच्या कामामध्ये सुत्रधार फेरबदल करत नाही. कारण प्रत्येकाचे कर्म
अगोदरच ठरलेले असते. पण नटाला मात्र आपल्या बुद्धी बलानुसार त्यात वाढविण्याला व कमी करण्याला सवड असते. वरील उदाहरणावरुन एक विचार करण्यासारखी गोष्ट निर्माण होते ती ही की, तो नट स्टेज वर येण्याच्यापुर्वी त्याला प्रत्येक कार्य नेमुन दिलेले होते तद्वत परमेश्वराने ज्या वेळी प्रथमत मानवी प्राण्याला निर्माण केले त्यावेळी त्या जिवाच्या मागे काही कर्म या जगरुपी स्टेज वर करण्याकरीता म्हणुन दिले. त्याबरोबरच त्यात कमी करण्यासाठी अगर वाढविण्यासाठी बुद्धी आणि विचार या दोन वस्तु दिल्या. परंतु यात विशेष म्हंणजे हे की , मायेने आपल्याला कोणते कर्म दिले आहे
व ते कसेकसे भोगायचे आहे, ते कर्म किती आहे, कोणत्या प्रकारचे आहे, याची जाणीव करुन देत नाही. कारण जन्ममरणाची परंपरा कायम ठेऊन जगाचे संसारचक्र कायम फिरत राहीले पाहिजे. एवढ्याकरिता जबरदस्त भुल घातली आहे. नाही मानवी प्राणी जन्माला येते वेळी जे कर्म घेऊन येतो त्याची भोगतेवेळी मनाच्या कल्पनेबाहेर न समजता भोगले जाते यालाच दैव अगर नशीब म्हणतो. अशारितीने एकदा परमेश्वराने हे दैव मागे लावले नंतर जिवात्मा हे दैव ज्यावेळी प्रत्यक्ष मन, बुद्धी,विचार आणि त्यात यांच्या सहाय्याने शरीराच्या द्वारे भोगायला प्रारंभ करतो त्यावेळी स्वेच्छा,
परेच्छा, आणि अनिच्छा या तीन मार्गांनी षटरिपुंच्या स्वाधीन होऊन जगातल्या संसाराचे धक्के खात सात्वीक,राजस व तामस अशी त्रिगुणात्मक कर्मे(आचरण) करुन परमेश्वराने नेमुन दिलेल्या कर्मात भर टाकतो. याचे उदाहरणार्थ:::सरकार एखाद्याला सब जज्ज अगर मामलेदार नेमते. पण नेमताना तु लाचलुचपत खाऊन निकाल देत जा असे काही सरकार सांगत नाही. उलट कायद्याच्या आधाराने,
ज्युरीच्या मताने व स्वताच्या सद्सदविवेकबुद्धीने व न्यायी पणाने निकाल द्यावा असाच वरचा हुकुम असतो व त्यालाही माहीती असते की लाचलुचपत घेणे हा कायद्याने गुन्हा सांगीतला आहे व त्याला दंड व शिक्षा ठरलेली आहे. लाचलुचपत घेऊन उघडकीला आला असताना परिणाम काय होईल हे पुर्ण माहीती असताना लाच
घेण्याचे धाडस करतो व निकाल विरुद्ध देतो. परेच्छेने हे क्रियमाण कर्म करुन पुर्वीच्या संचीत कर्मात भर टाकतो. मामलेदार अगर सबजज्ज होणे ही नशिबातील गोष्ट आहे. अधिकारावर आल्यानंतर रोज मेहनत घ्यावी लागते आणि या मेहनतीकरीता सरकार भरभक्कम पगार देते. अधिकार व पगार ही पुर्वीच ठरलेले आहेत. हे एवढे दैव सरकारने लिहुन ठेवले आहे व ते तेवढे च भोगले पाहीजे. सरकारने त्याच्या Service sheet वर अमकु इतकी लाच खावी असे लिहले नाही. पण हा खातो. तेव्हा त्याच्या दैवात हे कर्म नसताना उपस्थित झाले. अशा कर्मे स्वेच्छेला परेच्छेचे सहाय्याने घडत असतात. यालाच क्रियमाण किंवा चालु दैव असे म्हणतात. हा सबजज्ज जेव्हा लाचलुचपत खाऊन सत्यपक्षाच्या विरुद्ध निकाल देतो , त्यावे त्याच्या मनात असा विचार येत नाही की सत्यपक्षाच्या मनात आपल्या विरुद्ध द्वेषाचे बीज रुजले जाईल. बिचारा सत्यपक्ष हायकोर्ट व अखेर प्रिव्ही कौंन्सीलपर्यंत धाव घेतो. पण त्याला अपयश येते. त्यामुळे बिचारा सत्यपक्ष रात्रंदिवस सुड उगवण्याची
संधी पहात तळमळत असतो. परंतु या ठिकाणी अशी कल्पना करा की त्याला अशी संधी मिळाली च नाही, मग हे कर्म व या कर्माचे फल अजिबात नष्ट होऊन गेले काय? नाही शक्य नाही. तो सत्यपक्ष अहोरात्र सुडाच्या भावनेने व या जन्मी नाही तरी पुढील जन्मी सुड घेईन अशा वासनेने मयत होतो. बरं या कर्माची व वासनेची वाट काय? हे तर भोगावेच लागणारच. त्याला या जन्मी भोगावे लागले दिसत नाही,तर पुढील जन्मी तरी खास भोगावेच लागतेच. असे पुढच्या जन्मी भोगायला लावणारी कर्मे या जन्मी अशारितीने कळत अगर न कळत करुन ठेवीत असतात. अशा कर्माला आगामी दैव म्हणतात. एकंदरीत संचीत,क्रियमाण व आगामी या त्रयीला दैव अगर नशीब असे म्हणतात.