vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

दत्तजयंती निमित्त*श्री दत्त जन्माचे दुर्मिळ चित्र . एका चित्रात संपूर्ण दत्त जन्माची कथा सामावली आहे*.

दत्तजयंती निमित्त*श्री दत्त जन्माचे दुर्मिळ चित्र . एका चित्रात संपूर्ण दत्त जन्माची कथा सामावली आहे*.

 

आध्यात्मिक वार्ता-

दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रात हिंदू दिनदर्शिकेनुसार (डिसेंबर/जानेवारी) मार्गशीर्ष (अग्रहायण) महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो

*अनसूयेच्या सत्त्वाची परीक्षा पाहायला त्रिदेवींनी आपले नवरे पाठवले, तिने आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर तीनही देवांना बाळं करून इच्छाभोजन दिले. त्यामुळे अनसूयेचे सत्त्व राखले गेले, अतिथी धर्म पाळला गेला आणि मातृत्त्व लाभले. मात्र आपली खेळी आपल्यावर उलटल्याचे पाहून त्रिदेवी अनसूयेला शरण आल्या आणि आमचे पती आम्हाला परत कर म्हणाल्या. तेव्हा घेऊन जा तुम्ही तुमचा पती, हे अनसूया माता सांगत असतानाचा हा चितारलेला क्षण*!

*असूया शून्य अनसूया, अशी सत्त्वशील अनसूयेचे देहबोली. ऋषीपत्नी म्हणून श्वेत वस्त्र नेसलेल्या अनुसूयेच्या चेहऱ्यावर तीनही बाळांना जोजवून झाल्यानंतरचा मातृत्त्वाचा संतुष्ट भाव खुलून दिसतोय. जगाचा ताप हरण करणारे त्रिदेव बाल रुपात आल्यावर निश्चिन्तपणे झोपी गेलेत. आई जवळ असताना कसली काळजी! बरीच वर्षं वाट पाहूनही जे सुख हुलकावणी देत होते, ते सुख तिपटीने पदरात पडल्याचा सोहळा अनसूयेने सुंदर पाळणा बांधून आणि सजावट करून साजरा केला आहे. अत्री ऋषींचा आश्रम असल्याने पायाशी व्याघ्रजीन अंथरले आहे. आणि या तीन विश्वसुंदऱ्या आपल्या फजितीने खजील होऊन आपला नवरा कोणता हे ओळखण्यात मग्न आहेत*.

*पाठमोरी उभी असलेली भरजरीत वस्त्र परिधान केलेली अलंकारमंडित लक्ष्मी असावी. बाजूने डोकावणारी लाल साडीतली सावित्री आणि हात दुमडून कुतूहलाने पाहणारी पार्वती असावी. सुखी संसाराचे तेज, सौष्ठव तिघींच्या हातावरून आणि गौरवर्णावरून दिसतेय. एवढे सगळे सुख असूनही अनसूया मातेसमोर तिघी निस्तेज झाल्या आहेत*.

*तिघी आपापल्या जागी श्रेष्ठ, तरी त्यांना आपल्यापेक्षा कोणी वरचढ असेल ही कल्पना सहन न झाल्याने त्यांनी पतीला तिचे शीलहरण करण्यासाठी पाठवले. त्रिदेवांना अनसूयेचे सामर्थ्य माहीत होते, पण या तिघींचा गर्वहरण करण्यासाठी तिघांनी जोखीम पत्करली आणि अत्री ऋषी स्नानाला गेल्याची वेळ साधून, वेषांतर करून ‘आई, इच्छाभोजन दे, पण विवस्त्र होऊन!’ अशी मागणी केली. ‘आई’ अशी हाक ऐकल्याने अनसूयेला वात्सल्याचा पान्हा फुटला. तिघांना बालरूप केले. भोजन दिले आणि पाळण्यात जोजवले*.

*बाळं सगळीच गोड, गोंडस आणि* *एकसारखी. आपला पती नक्की कोणता, हे ओळखता न आल्याने तिघींनी शरणागती पत्करली आणि अनसूया मातेने तीनही देवांना पूर्ववत केले. तिचा पाळणा मात्र रिकामा झाला. अत्री ऋषी परत आल्यावर त्यांना हकीकत कळली. त्रिदेवांनी सपत्नीक उभयतांची क्षमा मागितली आणि आम्ही तुमच्याच पोटी जन्माला येऊ असे आश्वासन दिले. तो आशीर्वाद फळास आला आणि मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला म्हणजे आजच्याच दिवशी हे त्रिदेव दुर्वास ऋषी, दत्त गुरु आणि चंद्र अशा त्रिगुणात्मक रुपात प्रगट झाले*.

*अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त* 🚩🙏

संबंधित पोस्ट

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्व-स्वरूप संप्रदाय यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन…

हृदयसम्राट बाबा हरदेव सिंह यांना अर्पित ‘समर्पण दिवस’*

vishwatmaklokswamivarta

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त बुलढाणा शहरातून भव्य शोभायात्रा

आदेश अदिनाथ शिवजी को आदेश,आदेश चैतन्य कानिफनाथजी मढिनीवासी योगिराज को आदेश,बोल कानिफनाथ महाराज की जय:

vishwatmaklokswamivarta

अष्ट लक्ष्मी*आदि लक्ष्मी

vishwatmaklokswamivarta

गुरुचरित्र ग्रंथाची ताकद….

vishwatmaklokswamivarta