vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लोणावळा कारला लेणी परिसरातील येथील  एकवीरा देवीची पालखी सोहळा अचानक झाला भक्तांवर मधमाशांचा हल्ला…

लोणावळा कारला लेणी परिसरातील येथील  एकवीरा देवीची पालखी सोहळा अचानक झाला भक्तांवर मधमाशांचा हल्ला…

 

राज्य प्रतिनिधी

लोणावळ्यातील एकवीरा गडावर नववर्षानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमते. एकवीरा देवीचे स्थान असलेल्या कार्ला गडावर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भाविकांनी गर्दी केली होती. मात्र, काही हुल्लडबाज भाविकांमुळं इतर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. कलरफुल फटाके फोडल्याने एकविरा देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला.

लोणावळ्यातील एकवीरा गडावर आज हुल्लडबाज भाविकांनी मंदिराजवळ कलर धुराचे फटाके फोडल्यामुळं मधमाश्यांच्या पोळाला इजा पोहचवली. त्यानंतर मधमाश्यांनी भविकांवर हल्ला करत चावा घेतला. यात अनेक भाविकांची पळापळ झाली तर बहुतेक भाविकांना मधमाशांनी चावा घेऊन जखमी केले आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी आली होती. त्या पालखीतल्या काही भक्तांनी फटाके वाजविले त्याचा फटका बाकीच्या भक्तांना ही बसला आहे. मात्र गडावर फटाके वाजविण्यावर बंदी असतानाही काही भाविक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. एकवीरा गडावर फटाका बंदी कायम असावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जखमी भाविकांना तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर तातडीने उपचार करुन काहींना सोडून देण्यात आलं आहे. तर, ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना काही काळ निरिक्षणाखाली ठेवून मग डिस्चार्च देण्यात येणार आहे. प्रचंड धुरामुळे मधमाश्यांनी मोठा हल्ला,जत्रेवेळी पूजा करताना झालेल्या प्रचंड धुरामुळे मधमाश्यांनी मोठा हल्ला केल्याची अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा चेंगराचेंगरीची घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळं अशा संवेदनशील ठिकाणी जाताना भाविकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे

संबंधित पोस्ट

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

vishwatmaklokswamivarta

माजी खासदार दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली जन्मगावी पवनार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

समृद्ध भविष्याच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे यशस्वी डेस्टिनेशन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· इंडो- अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय परिषद २०२६

डॉ. रेवती श्रीनिवासन यांचे कार्य ठाण्यासाठी अभिमानास्पद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यात लवकरच नवे धोरण– मंत्री उदय सामंत

राज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृह येथे सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत आढावा बैठक