हवलदार कायम स्वरूपी सुरक्षा रक्षक पदाकरीता-इच्छूक माजी सैनिक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत
रायगड प्रतिनिधी-भारत ईलेक्टॉनिक्स लिमिटेड, पाषाण-पुणे यांच्या दि.08 जानेवारी 2025 पत्रान्वये माजी सैनिकांमधून सुरक्षा रक्षक (हवलदार कायम स्वरूपी) यूआर-1 व ओबीसी-1 अशी एकूण-02 रिक्त पदे भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीता कळविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इच्छूक माजी सैनिक उमेदवारांनी सुरक्षा रक्षक (हवलदार कायम स्वरूपी) पदाकरीता ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत) रायगड-अलिबाग ले. कर्नल राहुल वैजनाथ माने यांनी केले आहे
माजी सैनिक उमेदवाराचे शिक्षण इयत्ता दहावी पास अथवा सैन्यदलाकडून समकक्ष प्रमाणपत्र असावे. भारतीय सेनेमध्ये कमीतकमी 15 वर्षे सेवा झालेली असावी तसेच माजी सैनिक दि. 21 ऑक्टोबर 2019 नंतर सेवानिवृत्त झालेले असावेत. वय वर्षे 43 असावी.
रायगड जिल्ह्यामधील इच्छूक माजी सैनिक उमेदवारांनी www.bel-india.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्जदाराने ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करावयाची आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2025अशी आहे.