vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवउद्योजकांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – बाळासाहेब सोळंकी ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, मुंबई

नवउद्योजकांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – बाळासाहेब सोळंकी ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, मुंबई

 

( सुरेश गायकवाड ) नवी मुंबई- मागासवर्गीय समाजातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे उद्योजक बनावे यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन बाळासाहेब सोळंकी, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग यांनी केले आहे.

 खारघर येथील सत्याग्रह विधी कॉलेज येथे   मी उद्योजक होणार या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.सामाजिक न्याय विभाग, एस एस सी व्हिजन फाउंडेशन, सम्राट अशोका चेंबर्स ऑफ एग्रीकल्चर अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मागासवर्गीय समुदायातील नव उद्योजक यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व शासकीय योजनेच्या जनजागृतीसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.

 मागासवर्गीय समाजातील युवकांना उद्योजक बनण्यासाठी केंद्र सरकारच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात योजना कार्यरत आहेत त्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे प्रफुल उंबरे यांनी दिली. राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती केंद्राचे प्रभारी महेंद्र मालवीया यांनी उद्योग बनण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणींवर सविस्तर मार्गदर्शन केले. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या वतीने सुमारे 20 लाखापर्यंत नव उद्योजकांसाठी कर्ज देण्याची योजना सुरू असल्याचे यावेळी सांगितले. व महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असेही आवाहन महामंडळाचे महाव्यवस्थापक राकेश बेद यांनी केले. या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात जिल्हा अग्रणी बँकेचे अभिषेक पवार, आयडीबीआय बँकेचे विक्रम जैन यांनी नव उद्योजकांसाठी विविध बँकांच्या योजनांची माहिती दिली. कार्यशाळेच्या तिसऱ्या क्षेत्रात सत्रात सामाजिक न्याय विभागाच्या मार्जिन मनी या योजने संदर्भात सादरीकरण करण्यात आले.

  यावेळी या योजनेचा लाभ घेतलेले कुणाल वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक न्याय विभागाच्य या योजनेमुळे आपली आर्थिक उन्नती होण्यास मदत झाली असे सांगितले. कार्यशाळेचा शेवटच्या सत्रात उद्योजक देवानंद लोंढे, हॉटेल मालवणी तडकाचे आदर्श शेट्टी, यांनी आपले उद्योग जगातील आपले अनुभव सांगितले.आयात व निर्यात क्षेत्रातील अभय थंड गाणी यांनी आयात निर्यातीबाबत मार्गदर्शन केले.

   या कार्यशाळेस, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मोरे, समाधान इंगळे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड, जनसंपर्क अधिकारी संजय भोसले, जी के डोंगरगावकर, विश्वस्त राहुल शिक्षण प्रसारक मंडळ वाईल्ड विजन फाउंडेशनच्या शितल बोराडे, निलांबरी कांबळे आदीमान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना; विस्तारीत टप्पा-2 व 3 मध्ये जिल्ह्यातील 16 हजार 177 लाभार्थ्यांची जोडणी*

शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी विश्वपदयात्रा ; जालना शहरात जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

दिव्यांगांप्रती सन्मान आवश्यक आहे. दिव्यांगासाठी आता स्वतंत्र विभागाची स्थापना झाली असल्याने त्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ होण्यास मदत झाली असून जिल्हा प्रशासन दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले.

vishwatmaklokswamivarta

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’मधील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी स्वीकारला पदभार

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण..