vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेगावच्या आनंद सागर बाबत मोठी बातमी…कोट्यवधी रुपयांच्या इमारती, रेल्वे ट्रॅक, ढोलपुरी गेट तोडले !देणगीतून आलेल्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा,धर्मादाय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश३ महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश

शेगावच्या आनंद सागर बाबत मोठी बातमी…कोट्यवधी रुपयांच्या इमारती, रेल्वे ट्रॅक, ढोलपुरी गेट तोडले !देणगीतून आलेल्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा,धर्मादाय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश३ महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश

——————

शेगाव (बुलढाणा) – (वार्ताहर)  जागतिक नकाशावर कोरल्या गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव मधील आनंद सागर हा विज्ञान आणि आध्यात्माच्या पायावर उभा करण्यात आलेला मनोहरी प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. या संदर्भात आता श्री गजानन महाराज संस्थान शेगाव च्या काही संचालकांनीच तक्रारी दाखल करून विश्वस्तांनी भक्तांनी दिलेल्या देणगी मधून तयार करण्यात आलेल्या प्रकल्पातील मोठमोठ्या इमारती रेल्वे ट्रॅक, खेळणी, ढोलपुरी गेट इत्यादी निरस्त करून भाविकांनी दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या देणगीचा चुराडा केल्याचा आरोप सहाय्य्क धर्मदाय आयुक्त बुलढाणा यांच्या कार्यालयाकडे तक्रारीद्वारे केला होता. या प्रकरणात आता मोठी अपडेट मिळाली असून संस्थानच्या विश्वस्तांवर झालेल्या गंभीर स्वरूपाच्या आरोपांची पुढील तीन महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.    श्री गजानन महाराज संस्थान शेगाव चे विश्वस्तांमध्ये नीलकंठ शिवशंकर पाटील यांच्या सह १२ विश्वस्त कार्यरत असून यापैकी विश्वस्त श्रीकांत शिवशंकर पाटील आणि शरद महादेव शिंदे यांनी संस्थान मधील विश्वस्थांच्या मनमानी आणि गैरकायदेशीर कारभाराविरुद्ध विविध विभागासह सहाय्य्क धर्मदाय आयुक्त बुलढाणा यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. तर दुसरीकडे श्रींचे भक्त संस्थांचे हित चिंतणारे व्यक्ती आजही सरकारी दप्तरी संस्थांनाचे विश्वस्त प्रमोद वसंतराव गणेश आणि शैलेंद्र महादेवराव पाटील यांनीही लेखी पुराव्यांसह तक्रारी दाखल केल्या होत्या. यावरून नुकतेच सहाय्य्क धर्मदाय आयुक्त-2 यांच्या कार्यलयात पीठासीन अधिकारी श्रीमती एम.पी.डवले यांनी महारष्ट्र सार्वजनिक धर्मदाय अधिनियम १९५० च्या कलम ४१ (अ) अंतर्गत चौकशीचे आदेश पारित केले. या आदेशामध्ये पुढील २० दिवसांच्या आत शांततेने अधिकृत ७ विश्वस्तांचीच सभा बोलवन्यात यावी, धर्मादाय कार्यालयातील निरीक्षकांनी प्राप्त तक्रारींवरील मुद्यांचा सविस्तर तपास करुन अहवाल सादर करावा, तसेच कार्यालयातील निरीक्षकांना आनंद सागर प्रकल्प बंद होण्यापूर्वी व नंतरच्या सर्व बांधकामासह स्थावर मालमत्ता आणि जगंम मालमत्तांच्या नोंदी नियमानुसार नोंदवहित नोदविल्या आहेत का ? याची स्थळ पाहणी करावी, तसेच तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे मालमत्तेचा नाश, पाडकाम, विकी किंवा लिलावासाठी तशी कायद्यानुसार परवानगी घेण्यात आली का ? याचा सविस्तर तपशिल सादर करण्याचे आदेश पारीत केले आहे. या आदेशाने एकच खळबळ उडाली आहे.

चौकशीकडे सर्वांचेच लक्ष !  आनंद सागर या प्रकल्पाच्या माध्यमातून शेगाव शहर व परिसरातील हजारो कुटुंबीयांना रोजगारही उपलब्ध झालेला होता मात्र संस्थान च्या विश्वस्तांनी अचानकपणे घेतलेल्या तोडफोडीच्या निर्णया मुळे शहरात बेरोजगारी वाढली आहे. आता सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी दिलेल्या चौकशी आदेशामध्ये काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

भक्तांच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा ?भाविकांसह लाखो पर्यटकांनी आतापर्यंत आनंद सागर या प्रकल्पाला भेट दिली होती विदर्भातील सर्वात मोठे मनोहरी प्रकल्पातून आनंद सागर हे एक होते. संस्थानच्या विश्वस्तांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे भक्तांनी देणगीच्या माध्यमातून दिलेल्या कोट्यावधी रुपयांचा चुराडा संस्थानच्या विश्वस्तांनी केल्याचा आरोप तक्रारी करण्यात आलेला आहे.

(शासनाकडून मिळाला आहे 30 वर्षाचा भाडेपट्टा,     शेगाव येथील श्री संत गजानन महाराज महाराजांचा आनंद सागर या मनोहर प्रकल्पाचा पुढील ३० वर्षासाठी भाडेपट्टा वाढवून देण्याचा निर्णय शासनाने १९ जुलै २०१६ रोजी घेतलेला आहे. २५३ एकराच्या जागेत विज्ञान आणि अध्यात्माच्या पायावर हे मनोहारी उद्यान आनंद सागर या नावाने तयार करण्यात आले होते. २६ डिसेंबर २०१४ साली या जागेची लीज संपल्यानंतर शासनाने आणखीन ३० वर्षाचा भाडेपट्टा वाढवून दिला होता

0000000

संबंधित पोस्ट

शिराळा नगरपंचायत प्रभाग क्र. 4 मतदानासाठी संबंधित शाळांना सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीतालकटोरा स्टेडियमची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रासह देशात लम्पी व्हायरसचा कहर, देशभरात 58 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू…

vishwatmaklokswamivarta

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरतीसाठी सुधारित जाहिरात..

vishwatmaklokswamivarta

दिवाळी पहाट’ कार्यक्रम ; दादरला २१, मुलुंड येथे २२ ऑक्टोबरला

vishwatmaklokswamivarta