
पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
शुक्रवारी (दि.२८)
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती बसस्टॅंड रोड, मालजीपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवार दि.२८ रोजी सकाळी साडे नऊ वाजता आयोजीत करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील नामांकीत कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत.
या रोजगार मेळाव्यामध्ये रत्नप्रभा मोटर्स, नवभारत फर्टीलायझर्स लि, एक्सेल प्लेसमेंट, एलीगंट कोटिंग्स प्रा.लि., संजिव ऑटो पार्ट प्रा.लि, सवेरा फार्मासिटीकल प्रा.लि., एन आर बी बेअरींग लि., इंडूरंन्स टेक्नॉलॉजी ली., सुदर्शन सौर शक्ती प्रा.लि., भुवन व्हील्स प्रा. ली. (सोहम ऑटो), औरंगाबाद ऑटो ॲन्सीलरी प्रा.ली., बी जी ली -ईन ईलेक्ट्रीकल लि., फोर्ब्स प्रेसीशन टूल्स ॲड मशिन पार्ट्स, ग्रीव्हज कॉटन प्रा.लि. टि के प्रीसीशियन प्रा.लि. इत्यादी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामांकित नियोक्त्यांचे प्रतिनिधी ६०३ वेगवेगळ्या रिक्तपदांकरीता मुलाखती घेतील. यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनीअरींग, डिप्लोमा, आय टी आय, एच एस सी, एस एस सी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक उमेदवारांना विविध शैक्षणिक व व्यावसायीक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी ॲप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०२४०-२९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. दि.२८ रोजी सकाळी साडे नऊ वाजता कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून पात्रतेप्रमाणे विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देवून रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
०००००



