vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विवाह पुर्व समुपदेशन केंद्राचे उदघाटन संपन्न

विवाह पुर्व समुपदेशन केंद्राचे उदघाटन संपन्न

जालना, प्रतिनिधी :- राष्ट्रीय महिला आयोगाच्या निर्देशावरुन महिला सक्षमिकरण तसेच स्नेही कुटुंबासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि.8 मार्च 2025 रोजी प्रशासकीय इमारतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयासमोर विवाह पुर्व समुपदेशन केंद्राचे उदघाटन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

विवाहपुर्व समुपदेशन केंद्रामध्ये विवाह करु इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी विवाह पुर्व संवाद साधण्यात येणार आहे. सुखी कौटुंबिक जीवनासाठी जोडप्यांना सक्षम बनविणे, आधुनिक काळातील नातेसंबंधातील आव्हानाबद्दल संवाद साधण्यात येईल. लग्नाअगोदर व लग्नानंतर होणारे वाद विवाद, त्यामुळे होणाऱ्या कौटुंबिक व सामाजिक अडचणींचा वेळ असतानाच निपटारा होवू शकेल. त्यामुळे परिवार विभक्त्‍ होण्यापासून मदत मिळेल, असे उदगार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांनी यावेळी काढले. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

98 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन‘अभिजात मराठी’चा जयघोष, ग्रंथदिंडीने संमेलनाचा जागर सुरू तालकटोरा स्टेडियमचा परिसर मराठीमय…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा पोलिस दलाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण*47 आपत्ती प्रतिसाद किटचे वाटप

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचे अर्ज स्विकारण्यास दि.26 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

मराठी ही केवळ संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा येथे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

vishwatmaklokswamivarta

राजर्षि छत्रपती शाहु महाराज जयंतीनिमित्त गुरूवारी समता दिंडी, चित्ररथ…

शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन