vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या गावात-ग्रामदैवत आई नवलाई-भैरी पुनः प्राणप्रतिष्ठा आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा..

नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या गावात-ग्रामदैवत आई नवलाई-भैरी पुनः प्राणप्रतिष्ठा आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा..

 

राज्य प्रतिनिधी -सुभेदार नरवीर तान्हाजी आणि सूर्याजी मालुसरे यांच्या साखर गावाचे ग्रामदैवत आई नवलाई-भैरी यांची पुनः प्राणप्रतिष्ठा ( जीर्णोद्धार ) आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा दिनांक २४ व २५ एप्रिल २०२५ रोजीसंपूर्ण दोन दिवस धार्मिक आणि पारंपरिक रितिरिवाज पूर्ण करून पोलादपूरतालुक्यात संपन्न होत असल्याचे अध्यक्ष विनायकदादा मालुसरे आणि संतोष महादेव मालुसरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे सांगितले आहे.सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे पराक्रमी बंधू नरवीर सूर्याजी मालुसरे यांची चिरनिद्रा घेणारी समाधी आणि त्यावेळी त्यांची सौभाग्यवती सती गेल्या त्यांची सतीशिळा साखर गावात आहे. ८ वाड्यांची अशी पार्श्वभूमीअसलेले साखर गाव पोलादपूर तालुक्यातील कामथी नदी, ढवळी नदी आणि महाबळेश्वरातून उगम पावलेल्या सावित्री नदी या तीन नद्यांच्या तिरावर वसलेले एक मोठे सुंदर गाव. गावाला फार पूर्वीपासून ऐत्याहासिक, सामाजिक, राजकीय, पारमार्थिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे.दिनांक २३ एप्रिल २०२५ सकाळी ७ वाजता नवीन मूर्तीचे आगमन त्यानंतर गाव प्रदक्षिणा करीत टाळ-मृदंग, सनई-चौघडा, लेझीम, ढोल ताशा यांच्या गजरातशोभायात्रा. २४ एप्रिल २०२५ सकाळी १० ते दुपारी २ वा. पर्यंत वेदशास्त्र संपन्न गुरुजी-संजय कुलकर्णी यांच्या हस्ते प्रधान संकल्प,श्री गणेश पूजन, पुण्यहवाचन, मुख्य देवता स्थापना, नवग्रह स्थापना,वास्तूप्रसाद होमहवन, मूर्तीचे अग्नुतारण, जलाधिवास, धान्याधिवास प्रधानहवन, मूर्तीचा पिंडिकान्यास, होमहवन होणार आहे.२५ एप्रिल २०२५ सकाळी ८ वाजता मुख्यदेवता आई नवलाई आणि जोगेश्वरी,वाघजाई, भैरी, बापदेव, महादेव, जननी, सालूबाई, कालभैरी या मूर्तीची स्वानंद सुखनिवासी प. पू. गुरुवर्य अरविंद नाथ महाराज यांच्या हस्तेप्राणप्रतिष्ठा कलशारोहन – परमपूज्य योगीराज ब्रह्मचारी ह. भ. प. एकनाथ महाराज लाखे होणार आहे. दुपारी १ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हलगीवादक राजू आवळे पथक यांचे हलगी वादन. संध्याकाळी ५ ते ६ वा. साखरगावातील वारकऱ्यांचे सामुदायिक भजन, गावातील महिलांचा हरिपाठ तर आळंदीयेथील ह. भ. प.एकनाथ लाखे महाराज रात्रौ ९ ते ११ वाजता कीर्तन होणार आहे.रात्रौ १२ नंतर जेजुरी येथील जागरण गोंधळपोलादपूर तालुक्यातील समाजातील सर्व समाजधुरीण, सगे सोयरे, आप्त,इष्टमित्र परिवाराने अत्यानंदाने या धार्मिक कार्यक्रमाला मोठया संख्येनेउपस्थित राहावे असे आवाहन श्री. भरत चिमाजी चोरगे (उपाध्यक्ष), श्री.बाजीराव विठोबा मालुसरे (सचिव), श्री. सखाराम रामचंद्र बांद्रे (खजिनदार)श्री. दीपेश परशुराम मालुसरे (कार्याध्यक्ष) यांनी केले आहे.

रवींद्र मालुसरे-अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४

संबंधित पोस्ट

सीना नदी संवर्धनासाठी युद्धपातळीवर कामे राबविणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील-अतिक्रमित वीटभट्ट्यांवरही कारवाई होणार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजच पाटण्यात

ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे,महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस परेड मैदानावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन उत्साहात संपन्न

एसटी महामंडळातील सर्व बसेस २०३५ पर्यंत ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने राज्य शासन आणि एसटी महामंडळाकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आवश्यक असलेल्या चार्जिंग सुविधांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राज्यभरात किमान २०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक –

बुलढाण्यात नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत; डॉ. किरण पाटील यांना भावपूर्ण निरोप-विकासकामे वेगाने पुढे नेण्याचा संकल्प-डॉ.प्रविणकुमार देवरे

कर्मचारी समाधान शिबिरात 5 अर्ज दाखल