vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत 10 मे रोजी

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत 10 मे रोजी

        सांगली, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शनिवार, दि. 10 मे 2025 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ‍जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पक्षकारांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून तडजोडीने मिटविण्याबाबत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी केले आहे.

   या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्हा न्यायालय सांगली, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक न्यायालय, सहकार न्यायालय 1, 2 व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे (फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, बँकेची दिवाणी दावे, नियमित दिवाणी दावे, भूमि संपादन प्रकरणे, कौटुंबिक वादातील प्रकरणे, चलनक्षम दस्तऐवज (N.I. Act 138) प्रकरणे, कामगार न्यायालयातील प्रकरणे व दावापूर्व प्रकरणी (वीज बिल, टेलिफोन बिल, बँकेतील वसुली प्रकरणे) राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्यात जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, मुंबईसह  उपनगरात पहाटेपासून मुसळधार पाऊस

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’मधील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जमीन महसूल थकबाकीसाठी मालमत्तेचा जाहीर लिलाव 17 मार्चला

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा-एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना  – अन्न नागरी पुरवठा अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत कामांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा-नियोजनबध्द व शिस्तीत पार पाडावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ· जालना जिल्‍ह्यातील 30 केंद्रावर एकुण 9 हजार 760 विद्यार्थी देणार परिक्षा· परीक्षेदरम्‍यान अनुचित प्रकार करणाऱ्या विरुध्द गुन्‍हा दाखल होणार

vishwatmaklokswamivarta