vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माय भारत योजना; नागरी संरक्षण स्वयंसेवक नोंदणी सुरु…

माय भारत योजना; नागरी संरक्षण स्वयंसेवक नोंदणी सुरु…

 बुलढाणा, प्रतिनिधी: माय भारत, भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय (नवी दिल्ली) अंतर्गत नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी देशभरातील तरुणांना सक्रियपणे एकत्रित केले जात आहे. हा देशव्यापी उपक्रम तरुण नागरिकांना राष्ट्रीय कार्यात सहभागी करून घेण्याचा आणि विशेषतः आणीबाणी व संकटाच्या वेळी महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न आहे.

नैसर्गिक आपत्ती, अपघात, सार्वजनिक आणीबाणी आणि इतर अनपेक्षित परिस्थितीत नागरी प्रशासनास सहकार्य करू शकणारे एक प्रशिक्षित, प्रतिसाद क्षम व लवचिक स्वयंसेवक दल तयार करणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सध्याची परिस्थिती आणि वाढत्या सुरक्षा चिंता लक्षात घेता, एक मजबूत समुदायाधारित प्रतिसाद यंत्रणा उभारण्याची निकड आहे. नागरी संरक्षण स्वयंसेवक स्थानिक प्रशासनाला बचाव व निर्वासन, प्रथमोपचार अशा विविध सेवा देण्यामध्ये मोलाची मदत करतात. नोंदणीसाठी https://mybharat.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले असून नोंदणी प्रक्रिया सोपी आणि सर्वांसाठी खुली आहे. तरुणांनी पुढे येऊन या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र सदनात सूर-संगम संगीतमय कार्यक्रम गणेशोत्सवात मराठी संस्कृतीचा जागर

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या सुमारे ४४२ पेक्षा अधिक प्रवाशांची  मुंबई अग्निशमन दलाने स्नॉर्केल (शिडी) वाहनांच्या साहाय्याने सुटका…

राज्यभरात घराघरांमध्ये तसंच सार्वजनिक ठिकाणी रोषणाई, ढोल-ताशांच्या गजरात मानांच्या गणपतींचं होत आहे आगमन.

निधी वळविल्याचा अपप्रचार थांबवा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील नोकरभरती संदर्भात अहवाल सादर करावा- आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके

शेतकऱ्यांसाठी सामाजिक संस्थांचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मदतीचा ओघ