vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग सुपूत्र सदानंद करंदीकर यांचे दातृत्व-वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान

सिंधुदुर्ग सुपूत्र सदानंद करंदीकर यांचे दातृत्व-वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान

मुंबई, प्रतिनिधी :- डोंबिवलीतून लोकलने व पुढे बसचा प्रवास करुन ते मंत्रालयात आले… आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा लाखांचे दोन धनादेश सुपूर्द केले. पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी वीस लाखांची रक्कम समर्पित केली. सदानंद विष्णू करंदीकर असे या दानशूर सिंधुदुर्ग सुपुत्राचे नाव. श्री. करंदीकर मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील आहे.

आयुष्यभराची कमाई समाजासाठी समर्पित करताना श्री. करंदीकर यांनी ना कुठला गाजावाजा केला, न कुठली अपेक्षा ठेवली. त्यांच्या या दातृत्वाला मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाद दिली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कृतज्ञतापूर्वक हे धनादेश स्वीकारले. तसेच श्री. करंदीकर यांच्या संवेदनशीलता आणि दातृत्वाला नमन केले.

सदानंद करंदीकर हे खाजगी कंपनीतून निवृत्त झाले. त्यांच्या पत्नी श्रीमती सुमती करंदीकर शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. हे दोघेही नेरुळमधील आनंद वृद्धाश्रमात रहात असत. गतवर्षी ऑगस्टमध्ये करंदीकर यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला. कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशांसाठी करावी लागणारी धडपड सदानंद करंदीकर जवळून पाहिली. त्यामुळे त्यांनी पत्नीच्या स्मरणार्थ आपल्या कमाईतील मोठा भाग समाजालाच परत करण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच अध्यात्मात आणि शेतीत रस असलेले सदानंद करंदीकर यांनी मंत्रालयाकडे धाव घेतली. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाख आणि पंतप्रधान सहायता निधीला १० लाख असा एकूण २० लाख रुपयांच्या निधीचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.

सदानंद करंदीकर ८२ वर्षांचे आहेत. सध्या ते बहिण प्रभा श्रीराम शितूत यांच्याकडे राहतात. वृध्दाश्रम, कर्करोगग्रस्तांच्या कुटुंबीयांची धावपळ यांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या सिंधुदुर्ग सुपूत्र श्री. सदानंद करंदीकर यांनी सागरा प्रमाणेच समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठीचे आपले दातृत्वही अमर्याद असल्याचे सिद्ध केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

 

0000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हा नियोजन विभागाची राज्यस्तरीय बैठक दूरदृष्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न जिल्ह्यात जास्तीत जास्त लोकाभिमुख, लोकोपयोगी अन्,नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका -स्थायी, परिवहन समितींसह प्रभाग, विशेष व तदर्थ समिती सभापतींची निवड

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वन विभागाला वाहनांसह बचाव साहित्य महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वाहने सुपूर्द

वसमत नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवणार- उद्योग मंत्री उदय सामंत

राज्यपालांची राजभवन येथील कर्करोग जनजागृती शिबिराला भेट

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षणउच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण..