vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विधान परिषद प्रश्नोत्तरे :दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांमध्ये अनियमितता प्रकरणी चौकशी नंतर योग्य ती कारवाई – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

विधान परिषद प्रश्नोत्तरे :दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांमध्ये अनियमितता प्रकरणी चौकशी नंतर योग्य ती कारवाई – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा आणि बोदवड तालुक्यातील घाणखेड येथे १५ वा वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत विकास कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला असून विभागीय चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या अहवालानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य एकनाथ खडसे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री श्री. गोरे म्हणाले, मौजे वढोदा येथील ग्रामसेवक यांची बदली झाली असून त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे सरपंचांवर नियम ३९/१ अन्वये कारवाई केली जाईल. तर, मौजे घाणखेड येथील ग्रामसेवक यांचे निलंबन करण्यात आले असून सात महिन्यांनंतर पुनर्स्थापित करण्यात आले आहे. त्यांची सुद्धा विभागीय चौकशी सुरू असून दोन्ही प्रकरणी विभागीय चौकशीचा जो अहवाल येईल, त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

लातूर जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज…

vishwatmaklokswamivarta

ठाणे शहर पोलीस आयुक्त, जिल्हा माहिती कार्यालय, वेसाक इंडिया, के.जे. सोमय्या महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित

vishwatmaklokswamivarta

शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षित, दीक्षित आणि योग्य नागरिक बनवावे : राज्यपाल आचार्य देवव्रत

vishwatmaklokswamivarta

सीएसएल’ कोची द्वारा निर्मित पहिले ‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट –‘माहे’ नौदलाकडे सोपवण्यात आले

vishwatmaklokswamivarta

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान