vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

राज्य प्रतिनिधी- अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी अपेक्षित निधी मिळावा यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी निधीची मागणी पुरवणी मागणीतून पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.सदस्य संजय खोडके यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी स्पष्ट केले की, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आरोग्य विभागाचे एक महत्त्वाचे केंद्र असून, कॅथलॅबचे काम पुढील 15 दिवसांत पूर्ण करण्यात येईल. हॉस्पिटलमधील ऑपरेटिव्ह डॉक्टर्सच्या मानधनवाढीबाबत सदस्य विक्रम काळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, त्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला असून, विभागाच्या नियमांनुसार त्याला मान्यता देण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील निधीच्या वितरणात अन्याय होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, या योजनेमधून शासकीय रुग्णालयांना सध्या फक्त 12 टक्के निधी मिळतो. त्यामध्ये वाढ होऊन 50 टक्के पेक्षा जास्त निधी मिळावा, यासाठी नव्या धोरणावर काम सुरू असून, ते लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केले जाईल.

सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आबिटकर म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत रुग्णांकडून पैसे घेणे हा गंभीर प्रकार असून यावर तत्काळ चौकशी सुरू करण्यात येईल.

000000

संबंधित पोस्ट

गोंदिया जिल्ह्यातील वीजप्रश्न लवकरच मार्गी लागणार   – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेतून जलसंवर्धनाच्या कार्याला नवसंजीवनी देण्याचा संकल्प – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील-गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रा’ ही प्रभावी ठरणार – प्रा. राम शिंदे

घर घर संविधान” कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची जोरदार तयारी- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची घोषणा…

पेसा कायदा अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करा- मंत्री डॉ. अशोक वुईके

समस्त वारकरी संप्रदाय, संस्थान, संस्था आणि संघटना**वारकऱ्यांच्या मागण्यांसाठी पंढरपूर येथे ‘वारकरी महाअधिवेशन’ संपन्न!*  *वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांच्यात फूट पाडण्याचे कटकारस्थान रचणाऱ्यांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार!*