vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध् – शिरसाठ,परिषदेच्या ठरावांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – सावे ,मराठवाडा व्यापार परिषदेस व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद

व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध् – शिरसाठ,परिषदेच्या ठरावांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – सावे ,मराठवाडा व्यापार परिषदेस व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद

 

जालना : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातील व्यापारी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध् असून, मुख्यमंत्री व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईला आमंत्रित करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी रविवारी दिली. तर व्यापार परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ठरावावर आमच्या सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी येथे दिले.

मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्सच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त मराठवाडा चेंबर व औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा व्यापार परिषद रविवारी ‘मसिहा’च्या श्रीमती रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृह चिकलठाणा येथे आयोजित केली होती. यावेळी मंत्री महोदय बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्स अँड एग्रिकल्चर मुंबईचे माजी अध्यक्ष मानसिंह पवार हे होते. तर उदघाटक व प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री संजय शिरसाठ, कॅबिनेट मंत्री अतुल सावे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठवाडा चेंबरचे माजी अध्यक्ष सत्यनारायण लाहोटी उपस्थित होते. तर महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष प्रफुल्ल मालानी, मराठवाडा चेंबरचे माजी अध्यक्ष तनसुख झांबड, कल्याण बरकसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात मराठवाड्यातील सर्व जिल्हा व तालुका पातळीवरील ३०० पेक्षा अधिक व्यापारी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या परिषदेत मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा यांनी एकूण दहा ठराव मांडले. त्यास व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते मंजुरी दिली. परिषदेत शेवटी मराठवाडा चेंबरचे महासचिव श्यामसुंदर लोया यांनी आभार प्रदर्शन केले. परिषदेस हिंगोलीचे व्यापारी महासंघचे अध्यक्ष तथा माजी आ. गजानन घुगे, नांदेडचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, सुबोध काकाणी, परभणीचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके पाटील, जालन्याचे जिल्हाध्यक्ष विनीत साहनी, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष संजय कांकरिया, बीडचे कार्याध्यक्ष अशोक शेटे, धाराशिवचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव आदी उपस्थित होते. परिषद यशस्वी करण्यासाठी मराठवाडा चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत राठी, सचिव संतोष कावळे पाटील, कोषाध्यक्ष विकास साहुजी,

चौकट-व्यापार परिषदेत मांडण्यात आलेले दहा ठरावमहाराष्ट्रातील व्यवसाय कर रद्द करण्यात यावा. कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी वर्गातून दोन व्यापारी प्रतिनिधी निवडून दिले जातात. त्याची संख्या तीन करावी व त्यांना सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात यावी.

महानगरपालिका व नगरपालिका हद्दीत कुठलाही आस्थापना कर लावू नये. कर लावल्यास त्याला विरोध केला जाईल.व्यापारी आस्थापनावर लावलेल्या सोलार सिस्टिमने उत्पादित केलेल्या वीज वापरण्यावर कुठलेही बंधन टाकू नये.कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांना दुहेरी फीस लागत आहे. ती लागू नये अशी मागणी सरकारकडे करण्यात येणार आहे.

इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात वीजदर अधिक आहे. त्यामुळे उत्पादन व विक्री खर्च वाढत असल्यामुळे व्यापारी वर्ग इतर राज्याच्या व्यापारी वर्गाच्या स्पर्धेत टिकू शकत नाही. वीज दर कमी करण्यात यावे.

व्यापारी वर्गासाठी एक कल्याण मंडळ स्थापन करण्यात यावे.कामगार विमा (ESI) हा व्यापाऱ्यांना काढावा लागतो. पण त्याचा फायदा कामगारांना होत नाही. त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा.ट्रेडिंगचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याला लागणारे कर्ज गृहकर्जाच्या व्याजदराप्रमाणे दिले जावे.नाबार्डची रद्द केलेली योजना पुन्हा सुरू करण्यात यावी.

 

चौकट-व्यापाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे : मानसिंह पवार सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे असून, कालानुरुप व्यापाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानांशी जळवून घेत स्वत:ला अपग्रेड करणे गरजेचे आहे. तरच आगामी काळात व्यापारी तग धरु शकतील. अन्यथा स्पर्धेतील टिकणे अवघड होईल. त्यामुळे व्यापाऱ्यांनी एआय सारख्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या समस्या सोडविण्यासाठी करावा. त्याचप्रमाणे मजबूत संघटन असल्याशिवाय आणि आक्रमक धोरण स्वीकारल्याशिवाय व्यापाऱ्यांच्या समस्या सुटू शकणार नाहीत. त्यामुळे मराठवाड्यातील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवायच्या असतील तर मजबूत संघटन बांधणी करणे आवश्यक आहे. सपूर्ण मराठवाड्यातील जिल्हा आणि तालुकास्तरावर संघटनेचे कार्यालय असणे नितांत आवश्यक आहे. कार्यालय झाले तरच मजबूत संघटन बांधणी होऊ शकेल आणि पर्यायाने समस्या सुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष मानसिंह पवार यांनी केले

संबंधित पोस्ट

पावसामुळे सिंचन विहिरी कोसळल्याने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या -विविध मागण्यांचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे केंद्रीय कृषी कृषीआणि किसान कल्याण मंत्र्यांना निवेदन उपतालुकाप्रमुख ठोंबरेंनी दिले दिल्लीला जावून कृषी मंत्र्यांना निवेदन

नववर्ष महाराष्ट्रासाठी विकासाच्या नव्या संधी घेऊन येईल -उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द

vishwatmaklokswamivarta

पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून विभागाचा आढावा-पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देणार,पर्यावरण विभागातील कामांमध्ये लोकसहभाग घेत पर्यावरणपूरक वातावरणासाठी विशेष प्रयत्न करणार- पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

ईसिस’ दहशतवादी संघटनेकडून जालना शहराला ‘बॉम्ब’ने उडवून देण्याची धमकी… शहरात खळबळ…

प्रणवी भिसेचे संस्कृत स्पर्धेत यश

vishwatmaklokswamivarta