vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री मकरंद पाटील यांची तुकाराम अंभोरे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..जिल्ह्याचे पालकमंत्री दर पंधरा दिवसात असणार जिल्ह्यात…

पालकमंत्री मकरंद पाटील यांची तुकाराम अंभोरे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..जिल्ह्याचे पालकमंत्री दर पंधरा दिवसात असणार जिल्ह्यात…

 

बुलढाणा, प्रतिनिधी-जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील हे (दि.१५) ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण निमित्ताने बुलढाणा येथे आले, असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अभोरे पाटील यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.या भेटी दरम्यान भारतीय जनता पक्ष चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील, खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, माजी आमदार वसंतराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व भाजपाचे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एकत्रपणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. जिल्यातील सार्वजनिक विकास कामे, अतिवृष्टीसाठी लागणारी मदत, कमी पाऊस झाल्यास करावयाच्या उपायोजना यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्हाभरातून आलेले कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी अंभोरे पाटील यांच्या घरी एकच गर्दी केले होती. पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी समजून घेत जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे कामे करण्याचे आदेश दिले. तसेच दर पंधरवड्याला मी बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात येणार आहे. शेतकऱ्यांसह जनतेच्या अडीअडचणी प्रश्न समस्या समजून घेईल व ते सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करेल, असे मत कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊ- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील विविध कंत्राटी पदांसाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत एक दिवस गावकऱ्यासोबत उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

अमृत महा आवास अभियान २०२२-२३ मधील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर