vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गणेशोत्सवात कोकण रेल्वेचा गोंधळ – विशेष गाड्या उशिरा

गणेशोत्सवात कोकण रेल्वेचा गोंधळ – विशेष गाड्या उशिरा ,एसटी बस स्थानकांवर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना मोठा त्रास..

राज्य प्रतिनिधी-

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या  प्रवासाला मोठा ब्रेक लागला आहे. कोकण रेल्वे आणि एसटी बस स्थानकांवर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कोकण एक्सप्रेस गाड्या उशिरा धावत असून, कुर्ला, स्वारगेट आणि अन्य प्रमुख ठिकाणी विशेष बसेस सुरू केल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे काही ठिकाणी रेल्वे आणि बस दोन्हीवर विलंब झाला आहे. कुर्ला नेहरूनगर एसटी आगाराला चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रवाशांनी लालपरीबसला प्राधान्य दिले आहे. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ठाणे रेल्वे स्थानकावर मडगाव-मांडवी एक्सप्रेस उशिरा पोहोचत आहे ज्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे.

पुण्यात गणेशोत्सव काळात केंद्रभागातील गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले असून, २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान शिवाजी रोडवरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी गाडगीळ पुतळा चौकातून संताजी घोरपडे पथ वा कुंभाखेस चौक मार्गे प्रवास करावा लागेल. शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्यांसाठी जंगली महाराज रोडचा पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे

पुणे आणि त्याच्या आसपासच्या गावांमधून रात्रीच्या वेळेत प्रवाशांसाठी अतिरिक्त ७८८ बसेस सोडल्या जाणार आहेत. रात्री १२ नंतर बससाठी तिकीटदरामध्ये १० रुपये वाढ होणार असून, रात्री १२ नंतर बस पास मान्य केले जाणार नाही. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

संबंधित पोस्ट

विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा निर्णय झुडपी जंगलाबाबतच्या निर्णयाने विदर्भाच्या विकासाला चालना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

64 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाच्या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

गेल्या काही दशकांपासून पारशी लोकसंख्येत लक्षणीय घट होत आहे. पारशी समाजाच्या सतत घटणाऱ्या लोकसंख्येवर उपाययोजना म्हणून-जिओ पारसी” योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन..

शहरात प्रतिबंधात्मक कलम 37 (1) व (3) लागू

रिपब्लिकन पक्षाचा (खोरिपा) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर ११ मार्च २०२६ रोजी धडक मोर्चा….

मुंबईसह कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग, पुढील 48 तास महत्त्वाचे हवामान खात्याचा इशारा