vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जालना गणेश फेस्टिवल तर्फे त्रैभाषिक मुशायरा-कवी संमेलन

जालना गणेश फेस्टिवल तर्फे त्रैभाषिक मुशायरा-कवी संमेलन

जालना (प्रतिनिधी) : जालना गणेश फेस्टिवल २०२५ या सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने शनिवार दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता श्री कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल, जुना जालना येथे भव्य त्रैभाषिक मुशायरा व कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक मा. रामराव रिंढे भूषविणार असून हिंदी, उर्दू व मराठी अशा तिन्ही भाषांतील नामवंत कवी या संमेलनात सहभागी होणार आहेत.हिंदी कवी : मा. कमल किशोर शर्मा, डॉ. सलीम नवाज हशर, अब्दुल रज्जाक रहबर, शिवकुमार बैजलउर्दू कवी : आरिफ भाई, डॉ. रिहान दानिश, अब्दुल हसीब फतहान, हाफिज अनिस, नाजीम खान (सेवली), अब्दुल रहीम, जोहर हुसेन ताहेर, परवेज आलम, नईम खान नईम

मराठी कवी : रेखा बैजल, डॉ. संजीवनी तडेगावकर, सुनील लोणकर, गोविंदप्रसाद मुंदडा, कविता बोरगावकर, राजाराम जाधव, भीमराव सपकाळ, किशोर ज-हाड, प्रदीप इक्कर, कल्याणी देशमुख, रमाकांत कुलकर्णी, विठ्ठल काष्टे, सुरेश कायटे, शंकर कपाळे, प्रकाश कुंडलकर, पंडित वराडे, श्रीकांत गायकवाड, विनायक काळे, माधवी चव्हाण, गोवर्धन मुळक, वसंत कोलते, उत्तमराव शेजवळ, विद्या दिवटे, जगन्नाथ काकडे, सत्यशिला तौर, कैलास भाले, शिवाजी कायंदे, डॉ. प्रभाकर शेळके, डॉ. सुहास सदाव्रते, डॉ. शशिकांत पाटील, राम गायकवाड, प्रा. अशोक खेडकर, मनीष पाटील, रत्नमाला मोहिते, रेखा गतखणे, शिवाजी तेलंगे, डॉ. दिगंबर दाते, विनोद जैतमहाल, सुहास पोतदार, डॉ. एकनाथ शिंदे, साहिल पाटील, दिनेश शेळके, विनोद काळे, छाया वाघ, गणेश खरात, डॉ. राज रणधीर, मनीषा गायकवाड, लक्ष्मीकांत दाभाडकर, प्रा. शोभना भालेराव, जिजा वाघ, कृष्णा कदम, आबासाहेब म्हस्के, किशोर भालेराव, वैशाली फुके, समाधान खाडे आदी अनेक कवी आपली कविता सादर करणार आहेत.

या मुशायरा-कवी संमेलनाचे सुत्रसंचालन प्रा. पंढरीनाथ सारके करतील. या अनोख्या साहित्यिक मेजवानीत जालना व परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखेपाटील, अध्यक्ष २०२५ अशोकराव आगलावे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब घुगे, सतीश पंच व संयोजन समिती यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

एफएसएसएआयचा उपक्रम; खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी एक दिवशीय प्रशिक्षण-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर गतीने निपटारा करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती करा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

vishwatmaklokswamivarta

एका लग्नाची गोष्ट’-अनाथ पूजाला मिळाले हक्काचे घर; जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान