vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शरद पवार असो वा फडणवीस, कोणीही ओबीसीमध्ये नवीन जात टाकू शकत नाहीत, अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार; छगन भुजबळांचा इशारा

शरद पवार असो वा फडणवीस, कोणीही ओबीसीमध्ये नवीन जात टाकू शकत नाहीत, अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार; छगन भुजबळांचा इशारा

राज्य प्रतिनिधी-मराठा आणि कुणबी एक आहे हा मूर्खपणा असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मराठा समाज हा मागास नाही असे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही. मराठा कुणबी एक होऊ शकत नाही असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ  यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.

 

 मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटलो आहे. गॅजेट्स सगळे दफ्तर आहे. कोटा ओलांडला तर आम्ही दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर राहणार असल्याचे भुजबळ म्हणाले. केंद्र सरकारने एक कायदा बनविला आहे. जे ओबीसी किंवा दलित, आदिवासीमध्ये बसत नाहीत पण आर्थिक मागास आहे. पण सामाजिक दृष्ट्या EWS आरक्षण लागू झाले आहे.

त्यात 10 टक्के आहे, इतर 8 टक्के उमेदवार मराठा समाजाचे आहेत हे सरकारने जाहीर केल्याचे भुजबळ म्हणाले. ब्राम्हण सुद्धा शेतकरीआहेत. मारवाडी देखील शेतकरी आहेत, मग ते कुणबी आहेत का असे भुजबळ म्हणाले. 27 टक्क्यामधील 17 टक्के शिल्लक आहे. या 17 टक्क्यांमध्ये 374 जाती आहेत. तुम्ही आमच्यामध्ये आणखी कोणी टाकू नका

50 टक्के आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांसाठी आहे. पण मराठा समाज हा सामाजिक मागास ठरत नाही असे भुजबळ म्हणाले. आमच्या ओबीसीच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको असेही भुजबळ म्हणाले. शरद पवार असो की देवेंद्र फडणवीस कोणीही ओबीसीमध्ये एससीमध्ये एसटीमध्ये नवीन जात टाकू शकत नाही असे भुजबळ म्हणाले. आमच्यावर अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार असल्याचे भुजबळ म्हणाले

संबंधित पोस्ट

जिल्ह्याची आता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल – पालकमंत्री ना. मकरंद पाटील• बुलढाणा जिल्हा भक्ती-शक्तीचा सुरेख संगम..

vishwatmaklokswamivarta

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलाक्रीडा संकुल समितीच्या कामकाजाचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू; २५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

आंबेडकरी चळवळीचे लोकशाहीर दिवंगत प्रभाकर पोखरीकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

सांगली फळ महोत्सवात नऊ लाखांची उलाढाल – पणन अधिकारी ओंकार माने- शेतकऱ्यांनी मानले जिल्हाधिकारी अशोक काकडे, पणन विभागाचे आभार…

vishwatmaklokswamivarta