
अनिल देशमुख ‘ई.डी.’ चौकशीसाठी गैरहजर….. बार आणि हॉटेल मालकाकडून शंभर कोटी रुपये खंडणी वसुली प्रकरण.
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ई.डी.) तपासाला मे.सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याच्या कारणास्तव अनिल देशमुख आणि मुलगा हृषीकेश हे सोमवारी ई.डी. कार्यालयात चौकशीसाठी गैरहजर राहिले.
बार आणि हॉटेलमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये खंडणीवसुली करण्यास सांगितल्याचा आरोप बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने केला आहे.
मे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सी.बी.आय. आणि नंतर ई.डी.ने देशमुखांविरोधात तपास सुरू केला आहे.
देशमुख पितापुत्रांनी सोमवारी सकाळी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत चौथे समन्स बजावण्यात आले होते.
आपण तपासाला आव्हान देणारी याचिका मे.सर्वोच्च न्यायालयात सादर केली असून त्यावर ३० जुलैला सुनावणी होऊन पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.
त्यादरम्यान ई.डी.ने समन्स बजावण्यास देशमुख यांनी आक्षेप घेतला आहे.



