नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक २०२५ संदर्भासाठी प्राथमिक माहिती- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ नगरपरिषद व १ नगरपंचायत येथे सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.
कन्नड- २५ सदस्य. सिल्लोड-२८ सदस्य गंगापूर-२० सदस्य. खुलताबाद-२० सदस्य.
फुलंब्री- १७ सदस्य.ही निवड २ लाख ३४ हजार १६३ मतदार करणार आहेत.त्यात १ लाख १८ हजार ९७५ पुरुष मतदार तर १ लाख १५ हजार १७३ महिला व इतर १५ मतदार आहेत. एकूण २६७ मतदान केंद्रांवर हे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील
मतदार संख्याः-वैजापूर- एकूण ४२ हजार ३३४ (पुरुष-२१३४३, महिला-२०९९१)
पैठण- एकूण ३७ हजार ५४९ (पुरुष- १९०२५, महिला-१८५२४)
कन्नड- एकूण ३७ हजार ७८० (पुरुष-३७७८०, महिला-१८८१८, इतर-५)
सिल्लोड- एकूण ५४ हजार ८०८ (पुरुष-२८२७६, महिला-२६५२९, इतर ३
गंगापूर- एकूण २९ हजार २८७ (पुरुष-१४८२७, महिला१४४५४, इतर ६,खुलताबाद-एकूण १४ हजार ७७५ (पुरुष-७३५१, महिला-७४२४)
फुलंब्री- एकूण १७ हजर ७३० (पुरुष ९१९६, महिला ८४३३, इतर-१
मतदान केंद्र संख्या-वैजापूर-४८ पैठण-४४
कन्नड- ४३ सिल्लोड-६१ गंगापूर-३३ खुलताबाद-१९ फुलंब्री- १९ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ६१० मतदान यंत्रे व ३०५ कंट्रोल युनिट ची आवश्यकता आहे.
तसेच ७ निवडणूक निर्णय अधिकारी व ७ सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे-नामनिर्देशन पत्र स्विकारणे- दि.१० ते १७ नोव्हेंबर २०२५.उमेदवारांची यादी प्रसिद्धी-१८ नोव्हेंबर २०२५.
माघारी,छाननी, चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्धी-२६ नोव्हेंबर २०२५.
मतदान दि.२ डिसेंबर २०२५ मतमोजणी दि.३ डिसेंबर २०२५ खर्च मर्यादा-थेट नगराध्यक्ष ब वर्ग नगरपालिका-११.२५ लक्ष रुपये, सदस्य ३.५० लक्ष रुपये ,नगराध्यक्ष क वर्ग नगरपालिका-७.५० लक्ष रुपये, सदस्य-२.५० लक्ष रुपये,नगराध्यक्ष नगरपंचायत- ६ लक्ष रुपये, सदस्य-२.२५ लक्ष रुपये.