vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यातील अनेक ठिकाणाचे मॉल बंद, कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस न झाल्यामुळे मॉल बंदच ठेवण्याचा निर्णय

राज्यातील अनेक ठिकाणाचे मॉल बंद, कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस न झाल्यामुळे मॉल बंदच ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने  घेतला

मुंबई प्रतिनिधी15 ऑगस्टपासून राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यामध्ये राज्यभरातील मॉल सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कर्मचारी आणि ग्राहकांना लसीच्या दोन डोसची अट ठेवण्यात आली आहे. या एका अटींमुळे राज्यातील अनेक ठिकाणाचे मॉल बंद आहेत. कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस न झाल्यामुळे मॉल बंदच ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने  घेतला आहे

मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेले अन् 14 दिवस पूर्ण झालेले असावेत, अशी अट राज्य सरकारने घातली आहे. पण मॉलमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नसल्यामुळे मॉल सुरू करणे शक्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पुण्यासह अनेक ठिकाणाचे मॉल बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

GST: 143 वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याच्या सूचनेबाबत राज्यांकडून अभिप्राय मागवण्यात आल्याचं वृत्त अर्थ मंत्रालयाने फेटाळले

भाजप आमदार नितेश राणेंना हायकोर्टाकडून दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याची राज्य सरकारची ग्वाही

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी- पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी

मुंबई कांदिवली येथील ग्रॉवेल्स १०१ मॉल’  तत्काळ बंद करा;  मुंबई हायकोर्टाचा एमपीसीबीला आदेश

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता १० वी व १२वी च्या परीक्षा २४ जून ते १६ जुलै होणार. परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडाव्या यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण फुलारी यांनी मनाई आदेश जारी

बुलढाणा राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

vishwatmaklokswamivarta