
..भाजप आमदार नितेश राणेंना
हायकोर्टाकडून दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत
अटक न करण्याची राज्य सरकारची ग्वाही
मुंबई प्रतिनिधी :भाजपचे आमदार नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी नितेश राणे यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नितेश राणे यांच्या या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.



