vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे बुधवारी (दि.२५) रोजगार मेळावा

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे

बुधवारी (दि.२५) रोजगार मेळावा

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी कौशल्य विकास,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने जागेवर निवड संधी देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती बसस्टँड रोड, मालजीपुरा छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार दि.२५ रोजी सकाळी १० वा. रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील नामांकीत कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. त्यात आय सी आय सी आय बँक, कोटक महिंद्रा बँक, ईक्युटास स्मॉल फायनांन्स बँक, नेक्सलॅड कंन्सल्टींग एल एल पी इत्यादी नियोक्त्यांनी कोणतीही पदवी/ डिप्लोमा- मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक, आय टी आय – ऑल ट्रेड, एच एस सी, एस एस सी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराची २२८ रिक्तपदे उपलब्ध असून विविध शैक्षणिक व व्यावसायीक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे किंवा बायोडाटाच्या ४ प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०२४०-२९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी अर्ज करावे

vishwatmaklokswamivarta

इस्त्राईल देशात होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स पदासाठी संधी..

vishwatmaklokswamivarta

रोजगार मेळाव्यात 110 तरुणांना मिळाली नोकरी;  धूत ट्रान्समिशनकडून 27 जणांना जागीच नियुक्तीपत्रे

लातूर येथे १५ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; बँकिंग व फायनान्स क्षेत्रात नोकरीची संधी

व्यवसाय सुरु करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन*

जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी २२ जुलै रोजी खामगाव येथे रोजगार मेळावा आणि मार्गदर्शन सत्राचे आयोज न चिखली येथे प्लेसमेंट ड्राईव्ह