vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शेतकऱ्यांना लाभ देताना निकषांचे समान पालन करा- अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने   

शेतकऱ्यांना लाभ देताना निकषांचे समान पालन करा- अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने

 

 सातारा प्रतिनिधी: कृषी विभागाने शेतकऱ्यांना लाभ देताना शासनाने घालून दिलेल्या निकषांचे सर्व तालुक्यांमध्ये समान पद्धतीने पालन करणे बंधनकारक आहे. कोणत्याही पात्र शेतकऱ्याला लाभापासून वंचित ठेवू नये, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

अनेक शेतांमध्ये विद्युत तारा जमिनीलगत किंवा खूप खाली आल्या आहेत. यामुळे जीवितहानी किंवा मोठे अपघात घडण्याची शक्यता आहे. महावितरणने तातडीने या तारा उंच करण्याचे काम हाती घ्यावे. शहरातील विस्कळीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी बंद असलेली सिग्नल यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करावी. गोडोली ते मोळाचा ओढा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करावा, जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.

या बैठकीत ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांनी विविध समस्या मांडल्या यावर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही अप्पर जिल्हाधिकारी श्री. माने यांनी दिले.

0000

संबंधित पोस्ट

समाजकल्याण विभागाचा विभागस्तरीय कला व क्रीडा महोत्सव आजपासून

vishwatmaklokswamivarta

अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांची शोकसंवेदना

vishwatmaklokswamivarta

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन

मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘वाचन कट्ट्या’ला भेट अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल जिल्हाधिकारी स्वामी यांचे केले कौतुक

महाराष्ट्राच्या कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक संधी – पणन मंत्री जयकुमार रावल वर्ल्ड फूड इंडिया २०२५ प्रदर्शनात महाराष्ट्र दालनाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta