vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नमुंमपा पावणेगाव ग्रंथालयास स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तक संच व 10 लॅपटॉपची भेट

नमुंमपा पावणेगाव ग्रंथालयास स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तक संच व 10 लॅपटॉपची भेट

 

       नवी मुंबई प्रतिनिधी   एकविसाव्या शतकातील आधुनिक नियोजनबध्द शहर म्हणून नवी मुंबई शहराची वेगळी ओळख आहे. ही ओळख दृढ करताना शहरातील वाचन संस्कृती आणि वैचारिक वारसा जपण्याच्या हेतूने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी ग्रंथालये उभारली जात आहेत.

          या ग्रंथालयांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका पावणेगाव ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. नगरसेवक श्री.शशिकांत भोईर यांच्या पुढाकारातून नोसिल इं.लिमी. चे श्री. राजेंद्र देसाई व श्री. सुमित यांच्या हस्ते ग्रंथालयास विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा १७ पुस्तकांचा संच देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आला. या पुस्तकांमध्ये एमपीएससी, यूपीएससी तसेच इतर विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या दर्जेदार साहित्याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ग्रंथालयासाठी १ बॅग रॅक व १ चप्पल / बूट रॅकही भेट स्वरूपात देण्यात आले.

          याशिवाय ग्रंथालयात अभ्यासासाठी येणा-या विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधांचा लाभ मिळावा याकरिता १० लॅपटॉप देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या लॅपटॉपचा उपयोग विद्यार्थ्यांना ग्रंथालयात बसून अभ्यासासाठी होईल. या उपक्रमामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मदत होणार असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास हातभार लागणार आहे. यावेळी नमुंमपा ग्रंथपाल श्रीम. अर्चना नगराळे, सहा ग्रंथपाल श्रीम. शर्मिली दिघे उपस्थित होत्या. भविष्यातही अशा प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे मान्यवर अतिथींनी सूचित केले.

00000

संबंधित पोस्ट

एकल महिला धोरण कार्यशाळेस उस्फूर्त प्रतिसाद

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

अग्निशमन दलाचे बळकटीकरण करावे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७

vishwatmaklokswamivarta

नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्वीकारला पदभार

मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने हाहाकार! 🌧️ हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत ….

vishwatmaklokswamivarta

सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे मिरजेत तीन दिवसीय लावणी महोत्सव सुरू..