vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

घनसावंगी आणि अंबड येथे पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन कुक्कुटपालन दुग्धव्यवसाय गाय,म्हैसपालन प्रशिक्षणाचे आयोजन

घनसावंगी आणि अंबड येथे पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन कुक्कुटपालन दुग्धव्यवसाय गाय,म्हैसपालन प्रशिक्षणाचे आयोजन

जालना, प्रतिनिधी: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, एमसीईडी जालना द्वारे घनसावंगी आणि अंबड येथे आणि अंबड येथे 5 दिवसीय कालावधीचे ” पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) जालना जिल्हा द्वारे घनसावंगी कुक्कुटपालन दुग्धव्यवसाय गाय / म्हैसपालन” प्रशिक्षण कार्यक्रम” दि.16 जुन ते 19 जुन2026 या कालवधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजागार युवक-युवती व महिलांनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करावा असा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजना मागचा मुख्य उद्देश आहे. सदर प्रशिक्षणामधून प्रशिक्षणार्थीना स्वयंरोजगाराबाबत उपलब्ध बंदीस्त शेळीपालनः-शेळीपालनाची सद्य स्थिती शेळ्यांच्या विविध जाती निवड आदर्श गोठा शेळ्याचे प्रमुख आजार व लक्षणे प्रतिबंधक उपाय व उपचार शेळ्याचे संतुलित आहार, गाभण शेळ्याचे व करड्याचे संगोपन इ. सखोल मार्गदर्शन या शिवाय उद्योजकता प्रशिक्षण :- ज्यामध्ये उद्योजकीय प्रेरणा व गुणसंपदा, कौशल्य विकास व स्वयं मुल्यांकन (मी कोण आहे) उद्योग उभारणी विवध टप्पे, आपल्या कामासाठी कुठे संपर्क करावा, उद्योग व्यवसायाची निवड, उद्योग संधी, उद्योग व्यवस्थापन, बाजार पेठ व्यवस्थापन, मार्केटिंग व संभाषण कौशल्य, विविध कार्यालय व महामंडळांच्या कर्ज विषयक माहिती, राष्ट्रीय कृत बँका नाबार्ड, यांचे कार्य व योजनांविषयी माहिती लघु उद्योग नोंदणी कर्ज व सादरीकरण व प्रक्रिया, उद्योग संदर्भात कायदे, शासकीय कर्ज योजनांची माहिती व सवलती इ.बाबत तज्ञ व अधिकारी वर्गामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी हा किमान 7 वी पास व 18 ते 50 वयोगटातील असावा तसेच स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्याची प्रबळ इच्छा असावी. तरी इच्छुकांनी प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी दि.15 जुन 2026 पूर्वी कैलास भाबट, कार्यक्रम समन्वयक, मो. 7498398483 , 96896783942 जालना किंवा प्रकल्प अधिकारी विनोद तुपे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एमसीईडी) जालना द्वारा-मराठा पार्क बिल्डिंग, विशाल कॉर्नर, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) चौफुली, जालना. फोन.नं.02482 -220592 येथे संपर्क करावा. असे आवाहन विभागीय अधिकारी, एस के थोटे, अएमसीईडी छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात 29 सप्टेंबरला 15 ठिकाणी रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र 2026 चे आयोजन- युवक-युवती व उद्योगांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योगांना चालना; गोदाम, ऑईल मिल आणि प्रक्रिया युनिटसाठी लाखोंचे अनुदान

सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), तर्फेबदनापूर येथे मोफत ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

रायगड डाक विभागात पोस्टल लाईफ इन्शुरन्ससाठी डायरेक्ट एजंट भरती पात्र व्यक्तींनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा 

अक्षय्य तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी रायगड प्रशासन सज्ज;*नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई