vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

लोकशाही वाचविणाऱ्या सेनानींचे योगदान देश कदापी विसरू शकणार नाही आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग” – भास्कर आबा दानवे

लोकशाही वाचविणाऱ्या सेनानींचे योगदान देश कदापी विसरू शकणार नाही आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग” – भास्कर आबा दानवे

जालना (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी कार्यालय, जालना येथे मोदी सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त “विश्वास, विकास व जनकल्याण” या विषयावर प्रबुद्ध नागरी संमेलन तसेच २५ जून १९७५ रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने देशावर लादलेल्या आणीबाणीला ५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने “काळा दिवस” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीच्या रक्षणासाठी आणीबाणीच्या काळात संघर्ष करणाऱ्या ज्येष्ठ लोकशाही सेनानी व ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, रघुनाथ दीक्षित, अरुण उपाध्याय, बद्रीनाथ पठाडे, ॲड. विपुल देशपांडे, विजय कामड, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, नारायण पवार, धनराज काबलिये, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, अमोल कारंजेकर, वसंत शिंदे, शिवप्रकाश चितळकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सांगितले की, “२५ जून १९७५ हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने आणीबाणी लादून नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले, विरोधी पक्षांच्या नेत्यांना कारागृहात डांबले आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादले. त्या कठीण काळात लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी हजारो कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. अशा लोकशाही सेनानींचे योगदान देश कधीही विसरू शकत नाही.” “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशाने विकास, सुशासन आणि जनकल्याणाची नवी दिशा अनुभवली आहे. गरीब, शेतकरी, महिला, युवा आणि समाजातील प्रत्येक घटकाला केंद्रस्थानी ठेवून अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. विकसित भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले

यावेळी मंडळाध्यक्ष महेश निकम, सुनील खरे, संजय डोंगरे, अमोल धानूरे, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 00000

संबंधित पोस्ट

नोएडातील राष्ट्रीय कराटे स्पर्धेत जालना जिल्ह्याची सुवर्ण झेप,जालन्यात विजेत्या कराटेपटूंचे जल्लोषात स्वागत; महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते सत्कार, अक्षय गोरंट्याल यांची उपस्थिती, शहरातून विजयी रॅली

हिंद की चादर” कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी सचखंड पब्लिक स्कूलमध्ये विशेष कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

म्हाडातर्फे सदनिकांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन26 सप्टेंबर रोजी लॉटरीची सोडत मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांची माहिती..

मोहरम सण शांतता, सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

कोयना, वारणा धरणातील विसर्ग कमी..

विद्यार्थ्यांनी पाठयपुस्तकापुरते मर्यादित न राहता अवांतर वाचनाची सवय ठेवावी- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,शाळेच्या पहिल्याच दिवशी विदयार्थ्यांची बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक मरळक येथे उत्साहपूर्ण वातावरणात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न