vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

येळेगाव येथे #राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

येळेगाव येथे #राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

 

नांदेड, द प्रतिनिधी:- राष्ट्रीय पल्स #पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत आज प्राथमिक आरोग्य केंद्र, येळेगाव येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी यांच्या हस्ते ५ वर्षांखालील बालकांना पोलिओचे डोस पाजून मोहिमेची सुरुवात झाली.कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कासराळीकर, सरपंच प्रशासक सरस्वती गंगातीर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. युवराज बनसोडे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुर्यवंशी यांनी पोलिओ निर्मूलनासाठी लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये असे आवाहन केले. विशेषतः साखर कारखाना वसाहत, विटभट्टी आणि चुनाभट्टी परिसरातील ० ते ५ वर्षांखालील सर्व बालकांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यातील सर्व आयुष्मान आरोग्य मंदिर व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बूथवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून, जे बालक बूथवर येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी गृहभेटीद्वारे (Home Visits) लसीकरण पूर्ण केले जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाने पालकांना आपल्या ० ते ५ वर्षांखालील बालकांना #पोलिओचे ‘दोन थेंब’ पाजून मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्र या अभिनव प्रकल्पाचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले राष्ट्रीय परिषदेत प्रभावी सादरीकरण

आयुष्मान कार्ड असल्यास 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारØ नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत185 लाभार्थींची मोफत इको तपासणी

शहरी आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनची व्यापक पावले; नागरिकांना घराजवळ दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यास प्राधान्य- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम व ‘मिशन महाग्राम’चा आढावाआरोग्य संस्थांमध्ये गुणवत्ता मानकांची प्रभावी अंमलबजावणी करा -अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे

vishwatmaklokswamivarta

राज्यात आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा मोठा विस्तार २३९९ उपचार कॅशलेस; रुग्णालयांवर कडक नियंत्रण

vishwatmaklokswamivarta