vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शाळेच्या दर्शनी भागात शैक्षणिक शुल्का बाबत माहिती देणारे फलक सर्व शाळांनी लावावेत- जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

शाळेच्या दर्शनी भागात शैक्षणिक शुल्का बाबत माहिती देणारे फलक सर्व शाळांनी लावावेत- जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

 

नांदेड प्रतिनिधी:- मागील काही दिवसांपासून जिल्हयातील इंग्रजी माध्यमाच्या व मराठी माध्यमाच्या स्वयंअर्थसहायित तत्वावर चालणा-या शाळांच्या बाबतीत शैक्षणिक शुल्क व शालेय गणवेश आणि पुस्तके खरेदीसाठी बऱ्याच तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे नांदेड जिल्हयातील स्वयंअर्थसहायित तत्वावर चालणा-या सर्व शाळांनी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम-2011 मध्ये दिलेल्या सूचनेनुसार कार्यकारी समितीचे गठण करुन कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये सर्व वर्गांची शैक्षणिक शुल्क निश्चीती करण्यात यावी व अशा आशयाचे फलक सर्वांना दिसेल अशा ठिकाणी शाळेच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या आहेत.

तसेच याबाबतीत सर्व शाळा व्यवस्थापन अनुपालन करत आहेत किंवा नाही यावर नजर ठेवण्यासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.

शाळा व्यवस्थापनाने विदयार्थ्यांना स्कुल युनीफॉर्म,स्कुलबॅग, स्कुल शूज तसेच पुस्तके इत्यादि शाळेतून अथवा ठराविक दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करु नये.

स्वयंअर्थसहायित शाळा ज्या मंडळाशी संलग्नित आहेत, त्या मंडळाच्या अधिकृत पुस्तकांचा वापर शाळेच्या दैनंदिन अध्ययन अध्यापनात करावा. इतर प्रकाशनाची पुस्तके वापरू नयेत. तसेच त्यांच्या खरेदीचा आग्रह पालकांना करु नये.

वरील सूचनांचे अनुपालन करुन जिल्हयातील स्वयंअर्थसहायित तत्वावर चालणा-या इंग्रजी, मराठी व इतर सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांनी शाळेच्या दर्शनी भागामध्ये पुढील प्रमाणे फलक लावावा. सदर फलकामध्ये संस्थेचे नाव, शाळेचे नांव पुर्ण पत्यासह, युडायस क्रमांक, परीक्षा मंडळाचे नांव व मंडळ संकेतांक क्रमांक, शाळेचा शासन मान्यता आदेश, मान्य वर्ग पासून पर्यंत, वर्गनिहाय कार्यकारी समितीने निश्चीत केलेली वार्षिक शैक्षणिक शुल्क दर याप्रमाणे फलक लावून त्याच्या फोटोसह अहवाल गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयास सादर करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हयातील सर्व शाळांना आज दिली आहे.

०००००

संबंधित पोस्ट

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणीसाठी विशेष मेळाव्यांचे आयोजन

एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबिरा’चे उद्घाटन

प्रतिबंधात्मक प्लास्टिक मोहीमेत प्लास्टिक पिशव्यांची वाहतूक करणा-या टेम्पोवर धडक कारवाई

अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 181 कोटींच्या प्रशासकीय मान्यता -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

एक दिवसीय सायबर जागरुकता कार्यशाळा;आज जालना येथील कार्यालयांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

बम बम भोलेनाथ बाबा अमरनाथ यात्रेची नोंदणी येत्या १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे.