vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीवर अर्जाचे आवाहन • फलोत्पादन योजनांसाठी शेतकऱ्यांना अनुदान • प्रथम अर्ज, प्रथम लाभ तत्त्वावर निवड

अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीवर अर्जाचे आवाहन • फलोत्पादन योजनांसाठी शेतकऱ्यांना अनुदान • प्रथम अर्ज, प्रथम लाभ तत्त्वावर निवड

बुलढाणा, प्रतिनिधी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विविध फलोत्पादन, संरक्षित शेती, मशरूम उत्पादन, शेततळे, मधुमक्षिका पालन, कृषी यांत्रिकीकरण, साठवणूक व प्रक्रिया प्रकल्पांसह अनेक घटकांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

योजनेअंतर्गत फळबाग लागवड, स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, द्राक्ष, केळी, पपई, अवोकॅडो आदी फळपिके, रोपवाटिका, अळिंबी उत्पादन प्रकल्प, फुलशेती, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, वैयक्तिक व सामूहिक शेततळे, हरीतगृह, शेडनेटगृह, प्लास्टिक मल्चिंग, फळ कव्हर, तण नियंत्रक अच्छादन, मधुमक्षिका पालन, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, विविध प्रकारचे स्प्रेअर, फार्म गेट पॅक हाऊस, शीतगृह, शीतवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र तसेच कमी खर्चाचे कांदाचाळ व लसूण साठवणूक गृह अशा एकूण २९ घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

या घटकांसाठी पात्रतेनुसार ४० टक्के ते ५० टक्के अर्थसहाय्य तसेच काही घटकांसाठी प्रतियुनिट किंवा प्रतिहेक्टर लाखो रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे. प्रत्यक्ष देय अनुदान संबंधित घटकाच्या मंजूर निकषांनुसार निश्चित करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत. अर्जांची निवड “प्रथम अर्ज, प्रथम लाभ” या तत्त्वावर करण्यात येणार आहे.

योजनेसाठी अर्ज करताना लाभार्थ्याकडे अनुसूचित जातीचे वैध जात प्रमाणपत्र व फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी (मोका तपासणी) करून अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. संबंधित घटकासाठी यापूर्वीच अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित गावातील उपकृषी अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

माझं लातूर, हरित लातूर’ अभियानांतर्गत यंदा सलग दुसऱ्या वर्षी लातूर शहरातील गंजगोलाई येथे आयोजित ‘लातूर हरितोत्सव’चे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते संपन्न

ज्यातील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आ. सुधीर मुनगंटीवार सरसावलेआ. मुनगंटीवार यांची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा; सन २०१७ व २०१९ मधील कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी

महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर 10जणांचा मृत्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दु:ख व्यक्त..

vishwatmaklokswamivarta

महापौर सौ.सुजाता पाटील यांनी घेतला घणसोली, ऐरोली, दिघा विभागातील जलस्थितीचा आढावा

पीसीपीएनडीटी कायद्याच्या कडकअंमलबजावणीसाठीसोनोग्राफी, एमटीपी केंद्रांची वेळोवेळी तपासणी करा- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांसाठी खुशखबर-. मुंबईतील पहिला एलिव्हेटेड नेचर ट्रेल  वॉकवे पार्कचे उद्घाटन झाले उद्घाटन…