vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

ठाणे येथील श्री माँ विद्यालयात ७ वी आंतरशालेय योग स्पर्धा संपन्न 

ठाणे येथील श्री माँ विद्यालयात ७ वी आंतरशालेय योग स्पर्धा संपन्न

ठाणे प्रतिनिधी- प्रती वर्षीप्रमाणे यंदाही श्री माँ विद्यालयाच्या वतीने आंतरशालेय योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळांमधील मुलांकरिता आयोजित ही ‘योग’ स्पर्धा शनिवार दि. २७ जून रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १ या वेळेत घेण्यात आली.

इ. ५ वी ते १० वी मधील ठाणे, डोबिवली, बोरीवली, बदलापूर, अंबरनाथ इत्यादी शाळेतील विद्यार्थी या ‘योग’ स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत विविध योगासनांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले गेले. ठाण्यातील आणि ठाण्याबाहेर एकुण २७ शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. ‘योग’ स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.

सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे गुणवत्ता प्रशस्ती प्रमाणपत्र व चषक (ट्रॉफी) देण्यात आली. ही स्पर्धा व्यक्तिगत आणि समूह या दोन स्वरुप श्रेणींमध्ये घेण्यात आली होती.

निकाल पुढील प्रमाणे – सिनियर ग्रुप – प्रथम पारितोषिक डीएव्ही पब्लिक स्कुल, ठाणे; द्वितीय – न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर; तृतीय – रेनबो इंटरनॅशनल स्कूल, ठाणेज्युनिअर ग्रुप – प्रथम पारितोषिक डीएव्ही पब्लिक स्कुल, ठाणे; द्वितीय – रेनबो इंटरनॅशनल स्कूल, ठाणे; तृतीय – दि एसआयए प्रायमरी अँड हायस्कुल, डोबिवल

सिनियर ग्रुप (सोलो) – प्रथम पारितोषिक युनीव्हर्सल हायस्कुल, ठाणे; द्वितीय – डीएव्ही पब्लिक स्कुल, ठाणे; तृतीय – न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर

ज्युनिअर ग्रुप (सोलो) – दि एसआयए प्रायमरी अँड हायस्कुल, डोबिवली; द्वितीय – अंबर इंटरनॅशनल स्कुल, ठाणे; तृतीय – न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर

00000

संबंधित पोस्ट

महादेवा’ योजनेअंतर्गत जिल्हास्तर फुटबॉल निवड चाचणी;निवडलेल्या खेळाडूंना लिओनेल मेस्सीसमवेत खेळण्याची संधी..

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती क्रीडापीठाच्या आर्चरी प्रबोधिनीसाठी प्रवेश चाचणी ६ जुलैला;इच्छुक खेळाडूंना उपस्थित राहण्याचे आवाहन

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जालना येथे फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा; 25 जुनपर्यंत अर्ज करा

अभिमानाचा क्षण! 🇮🇳🏆सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या Asian Lacrosse Championship स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत इराकवर ९-२ असा दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले! 🥇

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 11 डिसेंबरला आयोजन प्रवेशासाठी 9 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत…

vishwatmaklokswamivarta