vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

शिवछत्रपती क्रीडापीठाच्या आर्चरी प्रबोधिनीसाठी प्रवेश चाचणी ६ जुलैला;इच्छुक खेळाडूंना उपस्थित राहण्याचे आवाहन

शिवछत्रपती क्रीडापीठाच्या आर्चरी प्रबोधिनीसाठी प्रवेश चाचणी ६ जुलैला;इच्छुक खेळाडूंना उपस्थित राहण्याचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी- क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे यांच्या अंतर्गत कार्यरत विविध क्रीडा प्रबोधिनींमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी निवासी खेळाडूंच्या सरळ प्रवेश व क्रीडा कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रतिभावान खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने ही प्रवेश प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

यापूर्वी मे २०२६ मध्ये विविध क्रीडा प्रबोधिनींसाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. मात्र आर्चरी (धनुर्विद्या) या खेळाच्या राज्यस्तरीय सरळ प्रवेश व कौशल्य चाचणीच्या कार्यक्रमात सुधारणा करण्यात आली असून, ही चाचणी आता दि. ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत क्रीडा प्रबोधिनी, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी ही चाचणी २९ जून रोजी होणार होती.

प्रवेश चाचणीसाठी उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंनी जन्माचा दाखला, आधार कार्ड, राज्यस्तर अथवा राष्ट्रीयस्तरीय स्पर्धेतील सहभाग व प्राविण्य प्रमाणपत्रे तसेच अलीकडील दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे सोबत आणणे आवश्यक आहे. संबंधित खेळाडूंनी विहित वेळेत चाचणीस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेश चाचणीसाठी केवळ खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार असून, अंथरूण-पांघरूण स्वतःसोबत आणावे. भोजनाची व्यवस्था खेळाडूंनी स्वतः करावयाची आहे. तसेच स्वतःचे क्रीडा साहित्य व गणवेशही सोबत आणावेत. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक अमर जाधव (मो. ८२७५४१९०३०) यांच्याशी संपर्क साधावा, असे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने कळविले आहे.

संबंधित पोस्ट

“मिशन लक्ष्यवेध” जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अंतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनीमध्ये २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरूप्रवेशासाठी २३ एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी १५-१६ एप्रिल रोजी निवड चाचणी..

मुंबईत फिट इंडिया – संडेज ऑन सायकल उपक्रमाची 75 वी आवृत्ती साजरी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 च्या भारतातील आयोजन

राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या हस्ते उद्घाटन ..    महाराष्ट्रातून एकूण 400 खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांचा सहभाग 

vishwatmaklokswamivarta