vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुलढाणा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम; मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा इशारा

बुलढाणा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम; मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा इशारा

बुलढाणा, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचे सक्रिय वातावरण कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ४ ते ७ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, मध्यम ते मुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ४ आणि ५ जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत एक-दोन ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी.

६ आणि ७ जुलै रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली तरी जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. या काळातही काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

सततच्या पावसामुळे नदी-नाले, ओढे आणि सखल भागातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यकपणे पूरग्रस्त किंवा पाण्याखालील मार्गांचा वापर टाळावा. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज असल्याने संपूर्ण विभागात पावसाचे सक्रिय वातावरण कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

संबंधित पोस्ट

जलवितरण व्यवस्थेत ऑटोमायझेशनसाठी सिडकोला टेंडर प्रक्रियेचे आदेश- उद्योग मंत्री उदय सामंत

कोल्हापूरच्या पर्यटन वैभवात कागलच्या पर्यटन व नौकायन केंद्रामुळे भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

स्वदेशी एक्स्पो’ची तयारी अंतिम टप्प्यात आज उद्घाटनकेंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटनकेंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम

नव्या मुंबईतील सागरी किनारा स्वच्छता मोहीमेसह प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई…

vishwatmaklokswamivarta

सनातनच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात ९ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न ! आगामी भीषण आपत्काळातून तारण्यासाठी व ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही !   – सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘रामराज्य’ स्थापनेचा जागर

शहर विकास आराखड्यातील आरक्षित जागेवर भव्य उद्यान, मैदान व नाट्यगृहउभारावे; आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाचानिधी उपलब्ध करू – नगरसेवक अश्विन अंबेकर