vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

देवगडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री नितेश राणे देवगड येथील पर्यटन केंद्राचे भूमिपूजन संपन्न

देवगडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री नितेश राणे-देवगड येथील पर्यटन केंद्राचे भूमिपूजन संपन्न

सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी : देवगड शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असून, विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. देवगड-जामसंडे शहराला आदर्श शहर म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने भव्य नाट्यगृह, आधुनिक पर्यटन केंद्र, पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प तसेच पंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

देवगड शहरात शासकीय जागेवर पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. या पर्यटन केंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज पार पडले. त्यावेळी ते बोलत होतेकार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, देवगड जामसंडेच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा श्रीमती सावंत, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता दिनेशकुमार बागुल, प्र. उपविभागीय अभियंता शैलेश मोरस्कर व सहायक अभियंता प्रणव देसाई उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. राणे म्हणाले, देवगड शहरात भव्य नाट्यगृह उभारण्याची स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ही मागणी आता पूर्णत्वास येणार असून, त्यामुळे देवगडच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडेल. याचबरोबर एका वर्षाच्या कालावधीत येथे आधुनिक पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार असून, पर्यटकांसाठी दर्जेदार आणि सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. या वाढत्या पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी विविध पर्यटन प्रकल्पांची उभारणी आवश्यक आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, तसेच जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही गती मिळेल. देवगडवासीयांच्या अपेक्षा आणि मागण्या पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. देवगडचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून, विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असेही पालकमंत्री श्री. राणे यांनी स्पष्ट केले

पर्यावरणाचा समतोल राखत पर्यावरणपूरक पर्यटन व उद्योगांना प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर राहणार असल्याचे सांगून त्यांनी देवगड परिसरात पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. अशा प्रकल्पांमुळे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण वाढेल, पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देवगडला पर्यटन, सांस्कृतिक वारसा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि रोजगारनिर्मिती यांचा समन्वय साधणारे आदर्श पर्यटन शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री श्री. राणे यांनी यावेळी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

रेडिओ क्लब येथे सुसज्ज आणि दर्जेदार जेट्टी उभारावी- मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

नवी मुंबई महानगरपालिकेची २०२५-२६ ची मालमत्ताकर बिले आता ऑनलाईन उपलब्ध, नवी मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय : यंदा प्रथमच ३० जूनपर्यंत मालमत्ताकर भरल्यास मिळणार १०% अर्ली बर्ड सवलत; तसेच बिल वाटपासाठी बचत गटांच्या महिलांचा सहभाग

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

राज्यांतर्गत पीकस्पर्धेसाठी अर्ज सुरू; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*खरीप हंगाम २०२६ मध्ये ११ पिकांसाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर स्पर्धा; राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास ५० हजारांचे बक्षीस

जालना हे विचारांचे शहर, जालन्याच्या विकासासाठी भाजपलाच संधी द्या – रावसाहेब पाटील दानवे-भाजपचाच महापौर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर भाजपला बहुमत दिल्यास जालन्याचा चेहरामोहरा बदलेल – कैलास गोरंट्याल एकजुटीने भाजपच्या पाठीशी उभे रहा – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta