vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यक्षेत्रात विमानतळाच्या आजुबाजुच्या परिसरात असणारे फार्म हाउस, मंगल कार्यालय येथील विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमामध्ये लेझर लाईटस, बीम लाईटसच्या वापरावर दि.६ जुलै ते ३ सप्टेंबर २०२६ पर्यंतच्या कालावधीसाठी बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३ (१) व (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व फार्म हाऊस, मंगल कार्यालय, विवाह सोहळा, सामाजिक कार्यक्रम इ. च्या आयोजक, मालक यांनी लेझर लाईट्स, बीम लाईट्स याचा वापर करु नये. कारण अशा वापर केल्यामुळे पायलटच्या दृष्यात अडथळा निर्माण होऊन लॅंडीग व टेकऑफ करण्यापूर्वी लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ अन्वये व प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तो शिक्षेस पात्र राहील,असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

पीपल्स एज्युकेशन सोसायटी ला 500 कोटी निधी देण्याचा राज्य सरकार चा निर्णय स्वागतार्ह ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र दिनानिमित्त माधवबाग खराडी तर्फे मोफत यज्ञ चिकित्सा शिबिर

vishwatmaklokswamivarta

जागतिक सायकल दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी अर्बन अड्डा २०२५ ला उपस्थिती लावली आणि “सायकलिंग, चिल्ड्रन अँड सिटीज” आणि “रोड टू सायकल२स्कूल” या पुस्तकांचं केलं प्रकाशन.

निराधार मुलांच्या आधार नोंदणीसाठी ‘साथी’चा आधार,एकही निराधार बालक आधार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे

अमृत दुर्गोत्सव 2025’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान ! शिवछत्रपतींना दिली विश्वविक्रमी मानवंदना

vishwatmaklokswamivarta

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून टोयोटा-किर्लोस्कर करणार पाणलोट विकास16 कोटी निधीतून 6167 हेक्टरवर जलसंधारण,11 हजारांहून अधिक ग्रामस्थांना होणार फायदा