vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

मुंबई, प्रतिनिधी : जिल्ह्यानिहाय पावसाच्या दुपारी ४ वाजेपर्यत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात ३१.७ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत सर्वाधिक पाऊस ठाणे (१९६.९ मिमी) जिल्ह्यात नोंदवला गेला; त्यानंतर पालघर (१८५.४ मिमी), रायगड (१३४.१ मिमी), मुंबई उपनगर (१२५ मिमी), पुणे (६९.४ मिमी) आणि मुंबई शहर (६२.१ मिमी) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

१ जूनपासून आतापर्यंत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक एकूण पावसाची (१,४८०.७ मिमी) नोंद झाली आहे. त्यानंतर पालघर (१,२९५.४ मिमी), रत्नागिरी (१,२७३.४ मिमी), ठाणे (१,१०३ मिमी) आणि सिंधुदुर्ग (१,००१.४ मिमी) या जिल्ह्यांचा क्रम लागतो. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथे अनुक्रमे ५१०.७ मिमी आणि ५१२.७ मिमी एकूण पावसाची नोंद झाली आहे.

कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय असल्याचे दिसून येत असून राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण चांगले आहे. मुसळधार पावसामुळे, मान्सून महाराष्ट्रात सक्रिय असल्याचे आशादायक चित्र आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड – उपमुख्यमंत्री अजित पवार भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा प्रतिभावान शिल्पकार गमावला; उपमुख्यमंत्र्यांची ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसांच्या कार्यक्रमातील प्रलंबित विषयांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सकस आहार देण्यास कटिबद्ध – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

ग्रंथ पूजनाने ठाणे ग्रंथोत्सव 2024 चे उद्घाटन संपन्न…

vishwatmaklokswamivarta

भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राने नवा टप्पा गाठला आहे. वाराणसी येथून देशातील पहिल्या हब-अँड-स्पोक आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये दि.12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन