vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चात २१ जुलै समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे मिलिंद बोर्ड यांचे आवाहन

उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चात २१ जुलै समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे मिलिंद बोर्ड यांचे आवाहन

जालना | प्रतिनिधी :

अनुसूचित जातीं च्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बहूजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे मराठवाडा सचिव मिलिंद बोर्ड जालना जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून सकाळी प्रारंभ होईल. अंबड चौफुली येथे सभा वेण्यात येईल. तसेच शिष्टमंडळामार्फत शासनाला जिल्हाधिकारी यांच्या तर्फे निवेदन देण्यात येणार आहे आरक्षण उपवर्गीकरणाच्या सार्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाविरोधात संविधानिक आणि लोकशाही मार्गाने समाजाची भूमिका शासनापर्यंत पोहोचविणे हा मोर्चाचा प्रमुख उद्देश आहे.

 

मोर्चात जालना जिल्ह्यातील सर्व समाज बांधव, माता-भगिनी, युवक-युवती तसेच समाजहिताची जाणीव असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक गाव, वस्ती आणि परिसरातून जास्तीत जास्त उपस्थिती राहून समाजाची एकजूट दाखवावी, असेही संघटनेने नमूद केले आहे.

मोर्चा शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडत संविधानिक मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन करत, सर्वांनी वेळेत उपस्थित राहून संघर्ष मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन वीआरएसपीचे मराठवाडा सचिव मिलिंद बोर्डे यांनी केले आहे. या मोर्चा मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर साहेब, भारतीय बौध्द महासभेचे भीमराव आंबेडकर साहेब, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अँड. सुरेश माने साहेब, आमदार राजकुमार बडोले साहेब, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष ववनराव घोलप साहेब यांची उपस्थीती राहील, आयोजकांमार्फत मोटर वाहन पाकींग विषयी वेळोवेळी सुचना देण्यात येतील त्यांचे पालन करावे, तसेच शिस्तीचा समाज आहे याचे भान ठेऊन आपला मोर्चा यशस्वी पणे पार पाडावा असे आवाहन करण्यात आले आहे

———–मिलिंद बोर्डे ,मराठवाडा सचिव, बीआरएसप 9854220101

संबंधित पोस्ट

हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे 350 शहिदी समागम शताब्दी वर्ष

फनेल झोन आणि मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशन निर्बंध बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला गती द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• विमानतळ फनेल झोन आणि जुहू मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशन निर्बंध बाधित इमारतींबाबत बैठक

राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचा समारोप; शालेय शिक्षणमंत्री दोन्ही दिवस उपस्थित शालेय शिक्षण दर्जेदार पद्धतीने देण्यासह विविध विषयांवर महत्त्वपूर्व चर्चा

vishwatmaklokswamivarta

साकोली मतदारसंघातील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करावी- मंत्री गुलाबराव पाटील

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावेत..

vishwatmaklokswamivarta

नवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला सक्षमीकरण उत्सव…

vishwatmaklokswamivarta