vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हास्तरीय ‘नशामुक्त भारत’ स्पर्धांचे २९ जुलै रोजी आयोजन राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्वाची संधी

जिल्हास्तरीय ‘नशामुक्त भारत’ स्पर्धांचे २९ जुलै रोजी आयोजन राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्वाची संधी

अहिल्यानगर, प्रतिनिधी: भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत (MY Bharat), अहिल्यानगर आणि सेंटर फॉर स्टडीज इन रुरल डेव्हलपमेंट (सीएसआरडी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा शक्ती-नशामुक्त भारताची शक्ती’ या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन दि. २९ जुलै २०२६ रोजी सीएसआरडी, अहिल्यानगर येथे करण्यात येणार आहे

युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणे आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ करणे, या उद्देशाने जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींना या स्पर्धांमध्ये वैयक्तिक किंवा सांघिक स्वरूपात सहभागी होता येणार आहे

स्पर्धांमध्ये लोकगीत (गायन), नृत्य, नुक्कड नाटक, माईम, चित्रकला, वादविवाद, लघुपट/रील, घोषवाक्य लेखन तसेच कविता (स्लॅम पोएट्रीसह) या विविध कला व साहित्य प्रकारांचा समावेश करण्यात आला असून, सर्व स्पर्धांचा विषय ‘नशामुक्त भारत’ हा आहे. युवकांनी आपल्या कलाकृतीतून व्यसनमुक्तीचा प्रभावी व सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहेस्पर्धेतील विजेत्यांना अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

इच्छुक स्पर्धकांनी मेरा युवा भारत (MY Bharat) पोर्टलवर नोंदणी करून इच्छित स्पर्धेची निवड करावी आणि मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी ९४२३४७०४३७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आयोजकांनी कळव

संबंधित पोस्ट

देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी अभियंत्यांनी योगदान द्यावे-महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 41व्या राष्ट्रीय विद्युत अभियांत्रिकी अधिवेशनात केले आवाहन 40 कोटीतून मेळघाटातील दुर्गम भागातील 22 गावांमध्ये वीज

विनापरवाना जैव उत्प्रेरक विक्री व साठवणूक; कृषी विभागाची कारवाई92 लक्ष रू. चा मुद्देमाल जप्त

राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर,विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ 

आनंददायी निवृत्ती वेतन योजनेंतर्गत सेवानिवृत्त १७१ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान..

खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धाचे आयोजन

राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना शास्त्रीय संगीताची मेजवानी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सव’

vishwatmaklokswamivarta