vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पराक्रम दिना’ निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन थोरले बाजीराव पेशवे जयंती निमित्त राज्यभर कार्यक्रम

‘पराक्रम दिना’ निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन थोरले बाजीराव पेशवे जयंती निमित्त राज्यभर कार्यक्रम

 

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी:- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 18 ऑगस्ट हा दिवस राज्यभरात ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा व राष्ट्रनिष्ठेचा परिचय नवीन पिढीला व्हावा, या उद्देशाने राज्यभरात 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

पराक्रम दिन साजरा करण्यासंदर्भात अमृत संस्थेमार्फत ‘पराक्रम दिन समिती’ स्थापन करण्यात आलेली असून त्या समितीमध्ये काकासाहेब विधाते, पांडुरंग बलकवडे, जगन्नाथ लडकत, मोहन शेटे, मंगेश खाडिलकर, सौ. कौमुदी परांजपे या दिग्गज इतिहास तज्ञ आणि अभ्यासक यांचा समावेश आहे. या पराक्रम दिन निमित्ताने शाळा, महाविद्यालये व खुल्या गटातील नागरिकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जात असून जास्तीत जास्त नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

  ‘पराक्रम दिन’ स्पर्धांचे गट व स्वरुप पुढीलप्रमाणे:- निबंध स्पर्धा, गट: शालेय गट, महाविद्यालयीन गट व खुला गट. नियम व अट: शब्दमर्यादा: जास्तीत जास्त 1000 शब्द, निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत टाईप करून त्याची PDF फाईल अपलोड करावी. निबंधासाठी लागणारे संदर्भ ‘अमृत पराक्रम दिन’च्या संकेतस्थळावर (Website) दिलेल्या लिंक्स, संदर्भ पुस्तके व माहिती पुस्तिकेवरच आधारित असावेत.   बक्षीसपात्र निबंधांबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील

२. वक्तृत्व स्पर्ध

गट: शालेय गट, महाविद्यालयीन गट व खुला गट:- नियम व अट: स्पर्धकाने स्वभाषणातील जास्तीत जास्त ७ मिनिटांचा व्हिडिओ सादर करणे अपेक्षित आहे. व्हिडिओ स्वतःचा, ओरिजिनल, स्पष्ट व ठळक आवाजातील असावा. व्हिडिओमध्ये कोणतेही व्हिज्युअल इफेक्ट्स, साऊंड इफेक्ट्स किंवा AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) जनरेटेड इमेजेस वापरू नयेत. उत्तम गुणवत्तेचा व्हिडिओ तयार करून ‘अमृत पराक्रम दिन’च्या वेबसाईटवर अपलोड करावा. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

रिल्स स्पर्धा:- गट: महाविद्यालयीन गट व खुला गट. प्रवेशिका पाठवण्याची मुदत व अधिक माहिती. कालावधी: 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2026.सहभाग कसा नोंदवाल? स्पर्धेचे स्वरूप, विषय, बक्षीसे आणि अधिकृत नियमावली ‘पराक्रम दिन’च्या अधिकृत संकेतस्थळावर (https://parakramdin.mahaamrut.org.in/) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संदर्भ पुस्तके आणि ई बुक : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी संबंधित शेकडो पुस्तके उपलब्ध आहेत. तथापि या स्पर्धांसाठी निवडण्यात आलेल्या विषयांसाठी निवडक संदर्भ पुस्तके “पराक्रम दिन समिती’ निश्चित केलेली आहेत. त्यांची यादी वरील संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे थोरले बाजीराव पेशवे यांचा जीवन प्रवास अतिशय सोपा आणि संक्षिप्त पद्धतीने ई बुक स्वरूपात या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि या ई बुक च्या आधारावरच प्रश्नावली देखील तयार करण्यात आलेले आहेत.

     सर्व शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांनी तसेच सर्व इच्छुकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘अमृत’ संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

देशाच्या विकासासाठी आणि धोरणनिर्मितीसाठी ‘एनएसओ’तर्फे 2026-27 मध्ये विविध सर्वेक्षणांद्वारे महत्वपूर्ण माहितीचे संकलन रोजगार, महागाई, उद्योग आणि कौटुंबिक उत्पन्नाचा घेणार वेध; ‘संख्या मित्रां’ मार्फत होणार माहिती संकलन

मुंबईतील लालबागचा मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपती येथून थेट गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या आपल्या वेबसाईट पोर्टलला आपल्या सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी केली विविध विकास कामांची पाहणी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महास्ट्राइड’ मूल्यांकन समितीची बैठक

अलिबाग जिल्हा न्यायालयातील लोकअभिरक्षक सेवेचा जनसामान्यांना आधार-आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या अशीलांना मोफत कायदेशीर मदत, विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम.

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजर्षि शाहू सहकारी बँकेचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून सात सदस्यांची राज्यसभेसाठी द्विवार्षिक #निवडणूक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून प्रसिद्ध