vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

निवृत्तीवेतनधारकांच्या सेवा आता ‘महा-उपलब्धी’ ॲपद्वारे मोबाईलवर निवृत्तीवेतनधारक मेळावा व ॲपविषयक कार्यशाळा उत्साहात

निवृत्तीवेतनधारकांच्या सेवा आता ‘महा-उपलब्धी’ ॲपद्वारे मोबाईलवर निवृत्तीवेतनधारक मेळावा व ॲपविषयक कार्यशाळा उत्साहात

गडचिरोली, प्रतिनिधी) : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना विविध निवृत्तीवेतनविषयक सेवा आता ‘महा-उपलब्धी’ या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे सहज उपलब्ध होणार आहेत. या ॲपच्या वापराबाबत माहिती व प्रात्यक्षिक देण्यासाठी तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणी आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली आणि जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग, गडचिरोली येथे दि. 6 ऑगस्ट रोजी कार्यशाळा व निवृत्तीवेतनधारक मेळावा आयोजित करण्यात आला

मेळाव्यात जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम, अपर कोषागार अधिकारी दीपक उके, जिल्हा निवृत्तीवेतनधारक संघटनेचे अध्यक्ष वामन जुवारे, सचिव सुरेश मांडवगडे, पोलीस निवृत्तीवेतनधारक संघटनेचे अध्यक्ष मडावी, कोषाध्यक्ष मंडलवार, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख प्रशांत धोंगडे, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विशेष कार्यकारी अधिकारी आलमपटलावार, बँक ऑफ इंडियाचे काकपुरे यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक उपस्थित होते.

कार्यक्रमात जिल्हा कोषागार कार्यालयाचे प्रवीण सोनवाणे यांनी ‘महा-उपलब्धी’ ॲपचे प्रोजेक्टरद्वारे थेट प्रात्यक्षिक सादर केले. ॲपमध्ये निवृत्तीवेतनधारकांना दरमहा निवृत्तीवेतन प्रदानाचा तपशील (पेमेंट हिस्ट्री), उत्पन्न प्रमाणपत्र, फॉर्म क्रमांक 16, ई-पीपीओ लायब्ररी तसेच निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध शासन निर्णय व अन्य महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिलीजिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम यांनी ‘महा-उपलब्धी’ ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना आवश्यक सेवा मोबाईलवर उपलब्ध होत असल्याचे सांगून जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

अपर कोषागार अधिकारी दीपक उके यांनी उपस्थितांच्या निवृत्तीवेतनविषयक शंका व अडचणींचे निराकरण केले. मोबाईल ॲप वापरताना अडचण आल्यास जिल्हा कोषागार कार्यालयातील सुविधा केंद्रामार्फत आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

संबंधित पोस्ट

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागाची वृक्ष लागवड मोहीम..

जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही यासाठी पोलीसांनी दक्षता घ्यावी**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

नवरात्रोत्सव विशेष वृत्तमालिका भाग 2 महिला व बालविकास विभागाच्या योजनांतून निवारा, आर्थिक मदत व कायदेशीर मदतीचा आधार महत्त्वाचे संपर्क क्रमांक वुमन हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 181 समस्याग्रस्त बालकांच्या मदतीसाठी टोल फ्री हेल्प लाईन 1098

vishwatmaklokswamivarta

नशामुक्त छत्रपती संभाजीनगरःमानवी साखळीद्वारे जनजागृतीनशामुक्त जीवनासाठी संकल्प करु या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

घरकुलाच्या मागणीसाठी दिव्यांगांचा-महानगरपालिकेवर धडक मोर्चा  

नांदणी येथील जैन मठास तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना प्रजागर्क पदवी

vishwatmaklokswamivarta