vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुकंपा नियुक्तीसाठी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसदारांचा परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा   – शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे

अनुकंपा नियुक्तीसाठी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसदारांचा परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा   – शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे

            सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील सर्व अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांनी अनुकंपा नियुक्तीसंदर्भात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या शाळेतील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसदारांचा परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयास शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे सादर करावेत. यामुळे संबंधित पात्र उमेदवारांचे नाव प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट करून पुढील कार्यवाही करणे सुकर होईल, असे सांगली जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

 राज्यातील खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून शासन निर्णय दि.27 जानेवारी, 2026 व शासन परिपत्रक दि. 4 जून, 2026 अन्वये सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. या शासन निर्णयामध्ये अनुकंपा योजनेची व्याप्ती, उद्दिष्ट, स्वरूप, कार्यपद्धती विषद करण्यात आली आहे. तसेच कार्यपद्धतीमध्ये अ) कुटूंबास योजनेची माहिती देणे, ब) मृत कर्मचाऱ्याच्या कुटूंबाने करावयाची कार्यवाही, क) शाळा व्यवस्थापनाने व सक्षम प्राधिकाऱ्याने करावयाची, ड) उमेदवाराच्या विनंतीनुसार गट बदलणे, इ) प्रतिक्षा सूचीतील उमेदवार बदलणे याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच उपमुद्दा ई) अनुकंपा नियुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना व फ) इतर तरतुदी याबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.

 

   अनुकंपा नियुक्ती योजनेच्या अंमलबजावणीतील दिरंगाई टाळण्यासाठी व दिवंगत कर्मचाऱ्याच्या गरजू कुटुंबियास तात्काळ आधार मिळावा, यासाठी या शासन निर्णयातील संबंधित सर्व तरतूदीचे पालन करणे शाळा व्यवस्थापनावर बंधनकारक असेल. तसेच शाळा / व्यवस्थापन यांना पवित्र पोर्टलमार्फत पदभरती करण्यासाठी शिक्षणाधिकारी (योजना) यांचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.

 

             या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण संचालक (योजना) यांना राज्यस्तरीय नियंत्रक अधिकारी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (योजना) यांना या योजनेच्या प्रयोजनार्थ सक्षम प्राधिकारी म्हणून मान्यता देण्यात आली असल्याचे प्रसिध्दीपत्रकात  म्हटले आहे

संबंधित पोस्ट

खत विक्रीसाठी नवी एल-१ यंत्रणा अनिवार्य

जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरावेत

जालन्यातील लक्कडकोट येथील जमीन वादाने पेटले रान; जयश्री कटके यांच्याकडून पोलीस व राजकारण्यांवर गंभीर आरोप

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असणार ..!

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

विदेशी गुंतवणूकीसाठी ‘महाराष्ट्र’ भारताचा गेट वे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta